Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयता गँगमधील 7 मुले बालसुधारगृहातून पसार

पुणे/प्रतिनिधी ः येरवडा परिसरात झालेल्या वादात पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांना येरवडा परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद

निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली
गौतम पब्लिक स्कूलची शंभर टक्के निकालची 18 वर्षाची परंपरा कायम
मनीष सिसोदियांना 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

पुणे/प्रतिनिधी ः येरवडा परिसरात झालेल्या वादात पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांना येरवडा परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र या बाल सुधारगृहात पाठवले होते. मात्र, या सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून या 7 आरोपींनी पळ काढला आहे.

बालसुधारगृहातील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी संतोष किसन कुंभार (वय 46, रा. पिंपरी चिंचवड) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून धुडगूस घालत दहशत निर्माण करणार्‍या अट्टल अल्पवयीन गुन्हेगारांना येरवडा परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र या सुधारगृहात ठेवण्यात आले होते. सुधारगृहात रोज होणार्‍या सत्रा अंतर्गत त्यांना कारागृहातून बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान, कोणीतरी अज्ञात आरोपीने मुलांना फूस लावून, पळून जाण्यासाठी उद्युक्त केले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या 18 वर्षीय आरोपीही या मुलांसोबत पळून गेला आहे. सोमवारी (30 जानेवारी) रात्री 11.45 ते 12.30 च्या सुमारास सुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून मुलांनी सुधारगृहातून पळ काढला. ही घटना लक्षात येताच याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात कोयता गँगने मागील काही दिवसांपासून जोरदार धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात कोयत्याने मारहाणीच्या आणि कोयता हवेत फिरवून वर्चस्व गाजवण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंध्यात्मक कारवाईला सुरुवात केली आहे, मात्र त्यानंतरही अद्याप कोयता गँगची दहशत कमी झालेली नाही.

COMMENTS