Homeताज्या बातम्यादेश

तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप

नवी दिल्ली ः तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूकंपाचे धक्के अतिशय

दिल्ली, पंजाबसह हरियाणात भूकंपाचे धक्के
जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप
राजधानीत भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली ः तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूकंपाचे धक्के अतिशय जबरदस्त होते. जमिनीपासून पाण्यापर्यंत सर्व काही थरथर कापल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. बरेच लोक ढिगार्‍याखाली गाडले गेले आहे. या आपत्तीमध्ये एकाचा मृत्यू झाला आणि 50 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे रस्ते आणि पूल हादरू लागले. डोंगरांना तडे गेले तर समुद्रामध्ये उंच लाटा उसळू लागल्याचे समोर आले आहे. पोलिस आणि प्रशासनाकडूनही नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे.

COMMENTS