Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे गटावर ऐनवेळी हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची नामुष्की

हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द ; बाबुराव कदम कोहळीकर यांना नव्याने उमेदवारी

मुंबई ः राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द कर

मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी… मुख्यमंत्री ठाकरे – शरद पवारांची बैठक
स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
बाळासाहेब थोरातांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

मुंबई ः राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीचे तिकीट देण्यात आले आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधून जोरदार विरोध करण्यात येत होता.
शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शिंदे गटाने एकूण आठ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर हेमंत पाटील यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला होता. मात्र आठवड्याभरातच आता हेमंत पाटील यांचे नाव मागे घेण्याची वेळ शिंदे गटावर आली आहे. त्यांच्याऐवजी आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 26 एप्रिल रोजी हिंगोली मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 4 एप्रिल ही शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी ठरलेला उमेदवार मागे घ्यावा लागला आहे. राज्यातील महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोध केला जात होता. तसेच उमेदवारी बदलण्याची मागणीही भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीतून करण्यात आली होती. या मागणीनंतर आता हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्याच्याऐवजी शिंदे गटाचे बाबुराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यासंदर्भात भाजपाकडून दबावतंत्र सुरू झाल्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थनार्थ 200 गाड्या भरून कार्यकर्ते मुंबईला आणले गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हेमंत पाटील डेरेदाखल झाले. हिंगोली मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हेमंत पाटील यांच्याऐवजी धनुष्यबाण या चिन्हावर अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी, असा सूर निघाला होता. त्यानंतर शिंदे गटाला आपला उमेदवार बदलण्याची नामुष्की आलेली आहे.

COMMENTS