Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड तालुक्यातील वराडे येथील अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्रासाठी साडेसात कोटी

कराड / प्रतिनिधी : वराडे (ता. कराड) येथे वन्य जीवांवर उपचार व देखभाल करण्यासाठी अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी 7 कोटी 58 ला

आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही : ना. अजित पवार
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

कराड / प्रतिनिधी : वराडे (ता. कराड) येथे वन्य जीवांवर उपचार व देखभाल करण्यासाठी अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी 7 कोटी 58 लाख रुपयांचा निधी नुकताच उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे वर्ग झाला आहे. खा. श्रीनिवास पाटील व राज्याचे सहकार मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये वन्य जीवांकरीता अत्याधुनिक उपचार पध्दतीने सुसज्य असे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले असून याचा फायदा सातारा जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्य जीवांना तातडीचे उपचार देणेकरीता होणार आहे.
सध्यस्थितीमध्ये जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करणे करताना पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. परंतू मूलतः वन्यप्राण्यांवर उपचार करणेकरता वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. वन्य प्राण्यांवर उपचार करताना कमीत-कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासात सोडणे आवश्यक असते.
या दृष्टीने आवश्यक उपचारपध्दती जसे की रेडिओथेरपी, पोटेबल एक्स-रे यांसारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. या उपचार केंद्रामध्ये मांस भक्षी प्राणी-पक्षी, तृणभक्षी प्राणी-पक्षी तसेच जलचर प्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून नैसर्गिक अधिवासशी मिळते-जुळते वातावरण तयार केले जाणार आहे. या उपचार केेंद्रामुळे वन्य जीवांवर उपचार करणे शक्य होईल.

COMMENTS