पंचवटी - वाढत्या चोरी, गुन्हेगारी , टोळी युद्ध आळा बसवायचा असेल यावर एक प्रभावी उपाय म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा (तिसरा डोळा ) होय. सामाजिक कार्यात
पंचवटी – वाढत्या चोरी, गुन्हेगारी , टोळी युद्ध आळा बसवायचा असेल यावर एक प्रभावी उपाय म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा (तिसरा डोळा ) होय. सामाजिक कार्यात पुढे असणारे विनायक गायकवाड व वृषाली गायकवाड यांनी दत्त जयंतीच्या पूर्व संध्येला सामजिक दायित्वातून फुले नगर परिसरात जवळपास ६० सी सी टी व्हीं कॅमेरे लोकार्पण केले. गायकवाड कुटुंबीयांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्याची उकल करण्याकामी पोलीसांना सदैव उपयुक्त ठरतो तो, तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा होय. सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड हे आपल्या कुटुंबासह राहूलवाडी या परिसरात राहत होते. सामाजिक कार्याची आवड व नेहमीच आपण समाज प्रति काही देणे लागतो. या कुटुंबास आपला परिसर सुरक्षित व्हावा व गुन्हेगारास आळा बसावा असे वाटत असे. याच संकल्पनेतून गायकवाड यांनी जवळपास सर्व फुले नगर परिसरात मायको दवाखाना पाठी मागील परिसर, त्रिमूर्ती नगर, राजदूत नगर, कालिका नगर, भोरे गल्ली, लक्ष्मण नगर, वडारवाडी, राहुलवाडी, भराडवस्ती, सोनार गल्ली, महाराणा प्रताप नगर, महालक्ष्मी चाळ, सम्राट नगर, वैशाली नगर, गौडवाडी, रेम्बो चौक, फुलेनगर पोलिस चौकी मागील परिसर, शेषराव महाराज चौक, विजय चौक, वॉटर टंक परिसर, गजानन चौक या भागात एकूण ६० सी सी टी व्हीं कॅमेरे बसविले आहे. याचा लोकार्पण सोहळा सोमवार (ता.२५) रोजी दुपारी बारा वाजता पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (प्रशासन) नंदन बगाडे, वृषाली गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कंट्रोल पंचवटी पोलीस ठाणे अंकीत फुलेनगर पोलीस चौकी येथे दिले आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात काही गैर कृत्य किंवा गुन्हा घडला तर पोलीसांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा माध्यमातून गुन्हेगार शोधण्यासाठी मदत होईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने गुन्हेगारी व गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेवक जगदीश पाटील, लक्ष्मण धोत्रे माजी नगरसेविका कविता कर्डक, सामजिक कार्यकर्त्या मोनिका हिरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे बबन मामा कदम, रमेश सोनवणे , विजय संगमनेरे शशिकांत वाघमारे ,तळेगावचे उपसरपंच प्रवीण कथार सचिन कथार, संतोष कांबळे रुपेश कोठुळे, दिपीका वाघमारे,मोनिका हिरे,रंजना संगमनेरे, ललिता संगमनेरे, जयश्री संगमनेरे, बबन कदम, विजय संगमनेरे, शशिकांत वाघमारे, मयुर लिंबाळकर, राहुल बोडके, राहुल कुलकर्णी, गोविंद कुटे, किशोर ढगे, रवींद्र वास्तव दोंदे, कुणाल कदम, नितीन शेळके, सागर बोडके, रवी दोंदे, संतोष सोनवणे, गोपीनाथ गुंडपाटील, मयुर वाघ, सुजीत खांदवे, प्रशांत घुगे, दिपक गोडसे, नागेश दरगोडे, हर्ष आढाव, सुरेश चव्हाण, शेख चाचा, अशोक दोंदे,संतोष सोनवणे, भाऊसाहेब आहिरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS