Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात 6 जणांचा मृत्यू

बुलडाणा/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी पहाटे सकाळी 5 वाजता एका कारला भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील 6

सैनिकी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दशरथ पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
राज्यात शनिवार, रविवारी लॉकडाऊन
राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट : राजेश टोपे

बुलडाणा/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी पहाटे सकाळी 5 वाजता एका कारला भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये झाला. जखमी नागरिकांना तातडीने बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात सहा जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसर्‍या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतामध्ये  हौसाबाई भरत बर्वे (वय 60), श्रद्धा सुरेश बर्वे (वय 28), किरण राजेन्द्र बोरुडे (वय 35), भाग्यश्री किरन बोरुडे (वय 28), प्रमिला राजेन्द्र बोरुडे (वय 58), जानवी सुरेश बरवे (वय 12 वर्ष) यांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये नम्रता रविन्द्र बर्वे (वय 32), रुद्र रविन्द्र बर्वे (वय 12), यश रविंद्र बर्वे वय 10 वर्षे, सौम्या रविंद्र बर्वे (वय 4), जतीन सुरेश बर्वे (वय 4), वैष्णवी सुनिल गायकवाड (वय19), सुरेश भरत बर्वे (वय 35)यांचा समावेश आहे.

COMMENTS