Homeताज्या बातम्याविदेश

मोरोक्कोत 6.2 तीव्रतेचा भूकंप

296 जणांचा मृत्यू, तर शेकडो जखमी

मोरोक्को प्रतिनिधी - आफ्रिकन देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरक्कोमधून एक भयानक घटना समोर आली आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री 6.8 रिश्टर स्क

राज्यात सक्षम तिसरा पर्याय देणार !
शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे
2 एक्स्प्रेस गाड्यांची धडक; 3 डबे घसरले| LOK News 24

मोरोक्को प्रतिनिधी – आफ्रिकन देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरक्कोमधून एक भयानक घटना समोर आली आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात शेकडो घरे कोसळली असून आतापर्यंत २९६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५३ लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. माराकेशच्या परिसरात इमारती पडत होत्या आणि घाबरलेले रहिवासी रस्त्यावर उतरले होते. त्याआधी ही भीषण आपत्ती घडली. मोठ्या प्रमाणात इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच जखमींना रूग्णालयात नेण्यात येत आहे

COMMENTS