Homeताज्या बातम्यादेश

बीएसएनएल कडून 5 जी ची चाचणी

खाजगी दूरसंचार कंपन्यांना धडकी

नवी दिल्ली / प्रतिनिधी : बीएसएनएलला लवकरच नफ्यात आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या (सी-डीओटी) सहकार

चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं
X यूजर्ससाठी धक्का! पोस्ट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे
साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मरसह पिंपळाचे झाड जळाले

नवी दिल्ली / प्रतिनिधी : बीएसएनएलला लवकरच नफ्यात आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या (सी-डीओटी) सहकार्याने बीएसएनएलच्या 5 जी नेटवर्कची चाचणी घेण्यात येत आहे. दरम्यान, बीएसएनएलचे 5 जी नेटवर्क येत असल्याने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना धडकी भरल्याची चर्चा आहे. कारण, प्रीपेड, पोस्टपेड प्लॅन्समध्ये देखील सगळ्याच दूरसंचार कंपन्या स्पर्धा करतात. त्यामुळे बीएसएनएलचे 5 जी नेटवर्क आल्याने स्पर्धा अधिक वाढू शकते.

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) 5 जी नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. बीएसएनएलने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस एक लाख 4 जी साइट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या बड्या खासगी टेलिकॉम कंपन्यांचे 5 जी नेटवर्क देशाच्या मोठ्या भागात आहे. दरम्यान, आता बीएसएनएलचे 5 जी नेटवर्क आल्याने स्पर्धा अधिक वाढण्याचे संकेत आहेत.

बीएसएनएलला लवकरच नफ्यात आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या (सी-डीओटी) सहकार्याने बीएसएनएलच्या 5 जी नेटवर्कची चाचणी घेण्यात येत आहे. सी-डीओटीने फोरजीसाठी नेटवर्क कोर उपलब्ध करून दिले आहे. हा कोर 5 जी साठीही वापरता येऊ शकतो. त्यासाठी काही अपग्रेडची गरज भासणार आहे. रिलायन्स जिओनंतर बीएसएनएल ही आपल्या 5 जी नेटवर्कसाठी स्वदेशी नेटवर्कचा वापर करणारी दुसरी कंपनी असेल.

बीएसएनएलला लवकरच 4 जी नेटवर्कसाठी केंद्र सरकारकडून 6000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि मुंबईत दूरसंचार सेवा पुरविणार्‍या बीएसएनएल आणि एमटीएनएलला सन 2019 पासून सरकारकडून सुमारे 3.22 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

COMMENTS