Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 52 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध

सुरज परमार आत्महत्येची एसआयटी चौकशी करा – खासदार राऊत
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 36 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यापैकी गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 19 अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये इन्कमटॅक्स विभागाकडून 30 कोटी 93 लाख 92 हजार 573 रूपये, तर रेव्हयून्यू इन्टेलिजन्स विभागाकडून 8 कोटी 30 लाख 84 हजार 878 रूपये, राज्य पोलीस विभागाकडून 8 कोटी 10 लाख 12 हजार 811 रूपये, नार्कोटिस्ट कंन्ट्रोल ब्युरोकडून 2 कोटी 50 लाख रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 कोटी 75 लाख 392 रूपये, कस्टम विभागाकडून 72 लाख 65 हजार 745 असा एकूण 52 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दिवसभरात झालेल्या कारवाईमध्ये नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. ह्यातून निवडणूक यंत्रणा दक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी व्हिजील पवर तक्रार करता येते. ह्या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

प्राप्तीकर विभागाचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत
धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणार्‍यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल. या नियंत्रण कक्षाकडे नागरिक 1800221510 हा टोल फ्री क्रमांक 8976176276 आणि 8976176776 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्राप्तीकर विभागाद्वारे जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

आचारसंहिता भंगाच्या 99 टक्के तक्रारी निकाली
15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅपवर एकूण 1 हजार 144 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1 हजार 142 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण 99 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल अ‍ॅप हे कोणत्याही पस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या पव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

COMMENTS