Homeताज्या बातम्यादेश

लडाखमध्ये पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

लडाख- लडाखमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के
हिंगोली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
लातूर पुन्हा हादरलं, 3 दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

लडाख- लडाखमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ने ट्विटरवर पोस्ट केले की लडाख आणि लेहमध्ये पहाटे 4.33 वाजता 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पाच किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमालय पर्वतरांगातील टेक्टोनिक प्लेट अस्थिर झाली आहे. त्यामुळे असे भूकंप दीर्घकाळ होत राहतील. यावेळी भूकंप होण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे. हे धक्के हिमालय पर्वतरांगांवर येतात. जम्मू आणि काश्मीर, लडाख, नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या भूकंपाचा प्रभाव कधी कधी दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या राज्यांमध्येही दिसून येतो.म्हणून वारंवार भूकंप येत आहे. 

रिश्टर स्केल वापरून भूकंप मोजले जातात. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचे मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरून केले जाते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरून मोजली जाते. ही तीव्रता भूकंपाची तीव्रता ठरवते

COMMENTS