श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 39 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. किश्तवाड जम्मू राष्ट्रीय महामार्ग 244 वर
श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 39 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. किश्तवाड जम्मू राष्ट्रीय महामार्ग 244 वर हा अपघात झाला आहे. किश्तवाडहून जम्मूकडे निघालेली बस 250 ते 300 फूट खोल दरीत कोसळली आणि यामध्ये 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 39 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत.
भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. डोडा येथील पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार अपघातातील मृतांची संख्या 39 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. तर 17जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालय किश्तवाड आणि सर्वसाधारण रुग्णालय दोडा येथे नेण्यात आले आहे. भीषण अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ’जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. असेच पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच अपघातातील प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील. अशी घोषणाही त्यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
COMMENTS