राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के जलसाठा शिल्लक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के जलसाठा शिल्लक

401 टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरू

मुंबई : राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात 25 मे अखेर 36.68 टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षी याच काळात हे प्रमाण 36.27 टक्के एवढे

पती-पत्नीच्या वादात दोन लहानग्यांचा नाहक बळी गेला l पहा LokNews24
कामगारावरील अन्याय दूर करा अन्यथा आंदोलन ः हर्षदा काकडे
छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

मुंबई : राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात 25 मे अखेर 36.68 टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षी याच काळात हे प्रमाण 36.27 टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठ्याचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात 1924 दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या 47.22 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात 3 हजार 327 द.ल.घ.मी. म्हणजे 45.13 टक्के, कोकण विभागात 1567 द.ल.घ.मी. म्हणजे 44.65 टक्के, नागपूर विभागात 1620 द.ल.घ.मी. म्हणजे 35.18 टक्के, नाशिक विभागात 2138 द.ल.घ.मी. म्हणजे 35.62 टक्के तर पुणे विभागात 4381 द.ल.घ.मी. म्हणजे 28.8 टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. तसेच टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात 155 गावांना आणि 499 वाड्यांना 101 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात 117 गावे, 199 वाड्यांना 102 टँकर्स, पुणे विभागात 71 गावे आणि 360 वाड्यांना 70 टँकर्स, औरंगाबाद विभागात 43 गावे, 23 वाड्यांना 59 टँकर्स, अमरावती विभागात 69 गावांना 69 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये 53ने आणि वाड्यांमध्ये 116 ने वाढ झाली आहे. तसेच टँकर्समध्ये 46 ने वाढ झाली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण 401 टँकर्समध्ये 89 शासकीय आणि 312 खाजगी टँकर्सचा समावेश आहे.

COMMENTS