Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरातील 323 कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी

आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव ः कोपरगाव शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावून कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार्‍या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहारतील नागरिकांना 323.3

गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या
लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका
लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

कोपरगाव ः कोपरगाव शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावून कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार्‍या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहारतील नागरिकांना 323.31 कोटीच्या भूमिगत गटार योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत कोपरगाव शहरातील भूमिगत गटारींसाठी निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून त्याबाबत त्यांचा अथकपणे पाठपुरावा सुरू होता. कोपरगाव शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून शहरालगत अनेक नवीन उपनगरांच्या निर्मितीमुळे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोपरगाव शहरातील या सर्व नागरिकांची पिण्याच्या पाण्याच्या अडचण कायमची दूर करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून त्यांचे ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या पाच नंबर साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात कोपरगाव शहराच्या नागरिकांना नियमितपणे मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे येणार्‍या मुबलक सांडपाण्याचे योग्य नियोजन होवून कोपरगावकरांचे आरोग्य देखील अबाधित राहावे यासाठी संपूर्ण कोपरगाव शहरात भूमिगत गटारी होणे खूप गरजेचे होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात मा.आ.अशोकराव काळे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या दौर्‍यावर आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी परतीच्या प्रवासात कोपरगाव शहरातील भूमिगत गटारींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी स्वत:जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांना दिली होती. त्याची प्रचीती एका आठवड्याच्या आत आली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कोपरगाव शहरातील 323.31 कोटीच्या भूमिगत गटार योजनेला तांत्रिक मंजुरी दिली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाप्रमाणे आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून भूमिगत गटारीचा देखील प्रश्‍न मार्गी लागणार असल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.  

मतदारसंघाचा विकास निधी साडेतीन हजार कोटीवर – कोपरगावच्या इतिहासात अनेक दिग्गजांनी काम केले असले तरी एका वर्षात तीन हजार कोटीचा निधी कोणालाच आणता आला नाही ते काम आशुतोषने करून दाखविले असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी (दि.21) कोळपेवाडी येथे झालेल्या मा.आ.अशोकराव काळे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात जाहीरपणे सांगितले होते. भूमिगत गटारीसाठी 323.31 कोटी निधीला मिळालेली तांत्रिक मंजुरी व निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास अजून काही अवधी शिल्लक असल्यामुळे या दरम्यान आ.आशुतोष काळे मतदार संघाच्या विकास निधीचा आकडा साडे तीन हजार कोटीवर सहज घेवून जाणार यात शंका नाही. 

COMMENTS