Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पनवेल रेल्वे स्थानक परिसरात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार 

नवी मुंबई प्रतिनिधी - पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. मुलगी आपल्या आईसोबत पनवेल रेल्व

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ द्या ; आ.सतीश चव्हाण यांची मागणी
ध्वजरोहनने शनिशिंगनापुरात शनिजयंती उस्तवा सुरुवात
विधानसभेपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकावे

नवी मुंबई प्रतिनिधी – पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. मुलगी आपल्या आईसोबत पनवेल रेल्वे स्थानकात झोपली होती. यावेळी आई लघवीसाठी गेली असल्याचा गैरफायदा घेऊन एका नराधमाने या तीन वर्षीय मुलीला उचलून नेत रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी तिच्यावर बलात्कार करत तेथून पळ काढला. आई परतल्यावर मुलगी दिसत नसल्याने शोधाशोध करत पनवेल रेल्वे पोलीस ठाणे गाठत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीसांनी तपास सुरु केला असता सदर घटना उघडकीस आली. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ 3 टीम बनवत आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान जुईनगर रायळेलाय स्थानकावर संशयित इसमाला ताब्यात घेत तपास केला असता त्याने गुन्हा कबूल केला. मनोज कुमार असे आरोपीचे नावं असून तो कळंबोली ब्रिज खाली वास्तव्य करतो. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असुन चिमुकलीवर पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

COMMENTS