Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांचा गंडा

पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात ऑनलाईन पद्धतीने गंडा घालण्याच्या गुन्ह्यात वाढ होत असतांनाच, पुण्यात दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने ऐा महिलेला पावणेतीन लाखाचा

पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा
यूटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगून नऊ लाखांचा गंडा
पेट्रोलपंप कामगाराने मालकाला घातला 28 लाखांचा गंडा

पुणे : पुण्यात ऑनलाईन पद्धतीने गंडा घालण्याच्या गुन्ह्यात वाढ होत असतांनाच, पुण्यात दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने ऐा महिलेला पावणेतीन लाखाचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा परिसरात राहणार्‍या एका महिलेस घरासमोर बसलेले असताना, दोन अनोळखी व्यक्ती येऊन भेटले. त्यांनी महिलेस दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने तिचा विश्‍वास संपादन करून, तिच्याकडून सोन्याचे पावणे तीन लाखांचे दागिने घेऊन हात चलाखी करून सदर दागिने लंपास करून आरोपी पसर झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कविता नरहरी चिप्पा (वय-52 ,राहणार-येरवडा ,पुणे) यांनी दोन अनोळखी चोरट्याने विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांची मैत्रीण रूपा भारत श्रीमल (वय- 40 ,राहणार-येरवडा ,पुणे) या त्यांच्या राहत्या घरासमोर बसलेले होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आले. त्यांनी आम्ही दागिने पॉलिश करून देत असल्याचे सांगितले. सुरुवातीला तक्रारदार कविता चीप्पा यांचे पैंजण पॉलिश करून त्यांचा विश्‍वास संपादन करण्यात आला. त्यानंतर श्रीमल यांचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे आरोपींनी सांगितल्याने, तक्रारदार यांनी पावणेतीन लाख रुपयांची सोन्याची चैन, अंगठी दागिने आरोपीकडे विश्‍वासाने दिले होते. यावेळी सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून न देता, रिकामा डबा देऊन चोरटे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दर्शना शेलार पुढील तपास करत आहे. डेक्कन परिसरात वडारवाडी ,गोखलेनगर भागात सराईत गुन्हेगार शिवानंद हूल्याळकर हा लोकसेवक नसताना, लोकसेवक असल्याचे भासवून त्याच्या खाजगी गाडीमध्ये लाल दिवा व काचेवर एक्स टेक्स्ट टाइल्स मिनिस्टर असल्याचे स्टिकर लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी याबाबत खातरजमा करून तक्रारदार बांधकाम व्यवसाय प्रवीण भीमराव डोंगरे (वय -45, राहणार-डेक्कन,पुणे ) यांनी तक्रार केल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध डेक्कन पोलिस घेत आहोत.

COMMENTS