Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानात 3 कोटींचा दरोडा

5 किलो सोन्यासह 10 लाखांची रोकड घेऊन चोरांचा पोबारा

पुणे ः अज्ञात इसमाने बनावट चावीचा वापर करुन रविवार पेठेतील एका सराफाच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश केला. त्यानंतर तब्बल 5 किलो 323 ग्

एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली
आनंदाचा शिधा विलंबाने गरिबा घरी दिवाळीनंतर फराळ होणार
राष्ट्रवादीचा निकाल

पुणे ः अज्ञात इसमाने बनावट चावीचा वापर करुन रविवार पेठेतील एका सराफाच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश केला. त्यानंतर तब्बल 5 किलो 323 ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह 10 लाख 93 हजारांची रोकड असा एकूण तब्बल 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.
याबाबत दुकानाचे मालक यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत राज कास्टिंग नावाचे सोन्याचे दुकान आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री दुकानाचे मालक दुकानाला कुलुप लावून राहते घरी गेले होते. त्यावेळी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलुपास बनावट चावी वापरुन दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुसरा व्यक्ती देखील त्याच्यामागे दुकानात शिरला. सदर दोन्ही चोरट्यांनी त्यांचे चेहरे हे कपड्याने झाकलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख अद्याप पटू शकली नाही. मात्र, दुकानाच्या सीसीटीव्हीत सदर चोरटे चोरी करत असल्याचे कैद झाले आहे. आरोपींनी दुकानातील 5 किलो 323 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 10 लाख 93 हजार रुपयांची रोकड असा एकूण 3 कोटी 32 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल लबाडीच्या उद्देशाने चोरी करुन नेला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरु केला आहे. चोरीच्या घटनेवरुन चोरी करणार्‍यात दुकानात सध्या काम करणार्‍या किंवा पूर्वी काम करत असलेल्या माजी कर्मचार्‍याचा समावेश असल्याचा संशय आहे. तक्रारदार यांचे दुकानाची व तिजोरीची बनावट चावी बनवून त्या चावीने दरवाजा उघडून दुकानात प्रवेश करुन दुकानातील लोखंडी तिजोरी बनावट चावीने उघडून चोरी करण्यात आल्याने त्याअनुषंगाने पोलिस कर्मचार्‍यांची चौकशी करत असल्याची माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा चुडप्पा यांनी सांगितले आहे.

COMMENTS