इस्लामाबाद ः पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तब्बल 28 प्रवाशी ठार झालेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले व मह

इस्लामाबाद ः पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तब्बल 28 प्रवाशी ठार झालेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले व महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बस तुर्बतहून बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टाला जात होती. रस्त्यात क्वेटापासून 700 किमी अंतरावर वाशूक शहराजवळ हा अपघात झाला. त्यात 6 प्रवाशांचा जागीच, तर 22 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका अवघड वळणावर बसचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
COMMENTS