Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणींचे 27 विद्यार्थी श्रीहरीकोटा सहलीसाठी रवाना-उपग्रह प्रक्षेपणाचा घेणार अनुभव

परभणी प्रतिनिधी - परभणी जिल्हा परिषदेंतर्गत 27 विद्यार्थी मंगळवार 16 मे रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतरीक्ष प्रक्षेपण केंद्रास भेटीसह

आयुष्यभर साहेबांना सलाम ठोकणाऱ्या शिपाई आई – वडिलांची स्नेहा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश
सर्वसामान्यांच्या मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजप सरकार कुठलाही विषय पुढे करीत आहे – नाना पटोले
आता हा ‘ सामना ‘ कसा रंगेल!

परभणी प्रतिनिधी – परभणी जिल्हा परिषदेंतर्गत 27 विद्यार्थी मंगळवार 16 मे रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतरीक्ष प्रक्षेपण केंद्रास भेटीसह उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घ्येण्याकरीता रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी हैद्राबादहून विमानाद्वारे गगनभरारी घेणार आहेत. छत्रपती संभाजी नगरातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावयाचा उपक्रम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून यशस्वीपणे राबविण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवरच आयुक्त केंद्रेकर यांनी आपल्या जन्मभूमीत म्हणजेच परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून तो उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला होता. त्यादृष्टीने 10 मार्च रोजी जिल्ह्यात परिक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेतून 9 तालुक्यातून प्रत्येकी 3 असे एकूण 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीक्षेत यशस्वी ठरलेल्या या विद्यार्थ्यांना मंगळवारी शिक्षण विभागाच्या भक्कम सहकार्याने श्रीहरी कोटा येथील अंतरीक्ष प्रक्षेपण केंद्र पाहण्यासह यंत्रणेचा अभ्यास तसेच त्या भागातील अन्य स्थळांचा आनंद लुटण्यासाठी सहलीसाठी रवाना करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती रश्मी खांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी या सहलीचे आयोजन केले असून यासाठी जिल्हा परिषद स्वनिधीतून तरतूद करण्यात आली आहे. हे विद्यार्थी मंगळवारी सकाळी सहलीवर रवाना झाले. या सहलीचा प्रवास परभणी ते हैद्राबाद ट्रॅव्हल्सने आणि संपूर्ण सहल विमानाने, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आयएसआरओ थुंबा ते त्रिवेंद्रम ते चेन्नई ते बेंगलोर ते हैद्राबाद हा विमानाने आणि परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळे, म्युझियम, प्राणी संग्रहालय, विज्ञान संकूल, ऐतिहासिक स्थळे पाहणे असा असणार आहे. 16 विद्यार्थीनी व 11 विद्यार्थी असे एकूण 27 मूले आहेत. तसेच या व्यवस्थेत अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी सह आठ जणांचा समावेश आहे. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, शिक्षणाधिकारी प्राथमिक विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीपाद देशपांडे, विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, सुधीर सोनुनकर, डॉ. कोमल शिंदे, शिक्षिका श्रीमती सारिका गिरी व श्रीमती पद्मजा गोरे यांचा समावेश आहे. दरम्यान, या सहलीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदिप घोन्शीकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी डॉ. रामेश्‍वर नाईक, शिरीष लोहट, शिक्षक, पालक उपस्थित होते. सहलीत या विद्यार्थ्यांचा आहे सहभाग जिंतूर तालुक्यातील शुभम गायकवाड, वैष्णवी शेळके, कार्तिकी ठोंबरे, गंगाखेड तालुक्यातून पूनम मोटे, राधा वरकडे, अंकिता मोटे, मानवत तालुक्यातून ज्ञानेश्‍वर मस्के, तेजस भिसे, ऋतुजा शेळके, पालम तालुक्यातून दिव्या पोळ, शशिकांत खेडकर, भक्ती पोळ, परभणी तालुक्यातून यशराज कच्छवे, श्रीनिवास रेंगे, प्रिया रेंगे, पाथरी तालुक्यातून आरुषी कोरडे, अथर्व वर्हाडे, प्रगती राऊत, पूर्णा तालुक्यातून दिव्या शिराळे, पवन सलगर, विद्या पौळ, सेलू तालुक्यातून स्नेहल गजमल, अनंत मांगदरे, वेदिका रासवे तर सोनपेठ तालुक्यातून विवेक धबडे, गोपाळ पवार, रुद्रांणी राजमाने या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

COMMENTS