Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस

मुंबई/प्रतिनिधी ः उत्तरेकडील राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. मुंबई पुण्यासह

पुण्यात बेकायदेशीर इंधनविक्रीचे रॅकेट उघडकीस
विवेकानंद प्री स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन
मोदींच्या या योजनेमुळे तरुणांनी थेट रेल्वेचं पेटवली | LOK News 24

मुंबई/प्रतिनिधी ः उत्तरेकडील राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. मुंबई पुण्यासह, कोकणात पाऊस बर्‍यापैकी झाला असला तरी, मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली नाही.
सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह रविवारी उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पावसाच्या सरी बरसल्याश कोकणातही पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात अत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचे सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरीइतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानंतर अमरावतीत रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळाली आहे. अमरावती शहरात पहिल्यांदा दमदार पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल ते मालटेकडी रस्त्यावर वाहनचालक खड्यातून वाट काढताहेत. सध्या पावसाच्या पाण्याने खड्डे भरले असल्याने वाहन चालकाची कसरत होते आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहेत.

COMMENTS