Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेची ऑनलाईन 24 लाखांची फसवणूक

पुणे  ः  पुण्यातील स्वारगेट परिसरात राहणार्‍या एका महिलेस कार रेंटल बुकिंगच्या व्यवसायात ऑनलाईन पॉझिटिव्ह रिव्ह्यू देण्याच्या पार्ट टाइम जॉब असल्

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडावर
नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत
टपाल विभागाच्या पेन्शन अदालतचे आयोजन

पुणे  ः  पुण्यातील स्वारगेट परिसरात राहणार्‍या एका महिलेस कार रेंटल बुकिंगच्या व्यवसायात ऑनलाईन पॉझिटिव्ह रिव्ह्यू देण्याच्या पार्ट टाइम जॉब असल्याचे सायबर चोरट्यांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा विश्‍वास संपादन करून, वेग-वेगळ्या बँक खात्यात 24 लाख 36 हजार रुपये भरण्यास भाग पाडून सदर रक्कम परत न करता फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रिमा देवांग बनकर (वय – 44, राहणार-पुणे) यांनी आरोपी विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार दीप्ती गुप्ता नामक मोबाईल धारक, थर्टी मेंबर्स ग्रुप टेलिग्राम ग्रुपचे धारक वापरकर्ते आणि थर्टी डाटा वन डॉटकॉम या वेबपोर्टलचे धारक वापरकर्ते आणि विविध बँक खातेदारधारक यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार 8 फेबु्रवारी 2024 ते 17 मे 2024 दरम्यान घडला आहे. दीप्ती गुप्ता नावाच्या महिलेने तक्रारदार रिमा बनकर यांना फोन करून तिचा थ्रीफ्टी कंपनीचा कार रेंटल बुकिंगचा व्यवसाय असल्याचे सांगितले. बुकिंगला पॉझिटिव्ह रिव्ह्यू देण्याचा पार्ट टाईम जॉब असल्याचा बहाना तिच्याकडून करण्यात आला. सदर रिव्ह्यू केल्यास भरघोस नफा मिळेल असे आमिष देखील दाखवण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांच्या विविध बँक खात्यामध्ये व गुगल-पे शी लिंक असलेल्या बेनिफिशियरी बँक खात्यात एकूण 24 लाख 92 हजार रुपये भरण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. त्यापैकी नफा स्वरूपात आजपर्यंत 56 हजार रुपये परत करण्यात आले .मात्र ,उर्वरित 24 लाख 32 हजार परत करण्यात आले नाही. याबाबत पोलीस निरीक्षक एस बागवडे पुढील तपास करत आहे.

COMMENTS