Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये दहा दिवसांत 2 हजार 740 वीज जोडण्या

1 हजार पेक्षा जास्त विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण

अहमदनगर/प्रतिनिधी ः महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व तत्पर सेवा देण्याकरिता तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी महावितरणच्या न

भाचेबा तुमच्या मतदारसंघाप्रमाणे मामाच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या : जयंत पाटील यांची भाचे तनपुरेंकडे मागणी
छ. राजर्षी शाहू को-ऑपरेटिव्ह बँकेत शाहू महाराजांना अभिवादन
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार व्हावा ः आ. आशुतोष काळे

अहमदनगर/प्रतिनिधी ः महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व तत्पर सेवा देण्याकरिता तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी महावितरणच्या नाशिक परिमंडलअंतर्गत 02 ते 11 ऑगस्ट या दहा दिवसात ग्राहक सेवा अभियान राबविण्यात आले असून याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 हजार 70 ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यात आले असून तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी 2 हजार 740 तात्काळ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.  
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तथा महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या निर्देशानुसार नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या दहा दिवसांच्या मोहिमेमध्ये तात्काळ विविध तक्रारींचे निवारण करण्यात आले असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकृषक ग्राहकांना पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी अहमदनगर ग्रामीण विभागात 683, अहमदनगर शहर विभागात 827, कर्जत विभागात 263, संगमनेर विभागात 692 आणि श्रीरामपूर विभागात 275 अशी एकूण अहमदनगर मंडळात तात्काळ 2 हजार 740 नवीन विद्युत जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच अहमदनगर मंडळात वीज ग्राहकांच्या 1 हजार 70 तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले आहेत. या तक्रारीमध्ये प्रलंबीत विद्युत जोडणी (पेड पेंडींग), कायमस्वरूपी तथा तात्पुरता खंडीत केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करणे, विद्युत देयकाच्या नावात बदल, विद्युत भार बदल, वर्ग बदलवारी, पत्ता बदल तसेच वीज बिल दुरुस्ती अशा तथा इतर तक्रारींचा समावेश होता. हे अभियान यशस्वी करण्यासाठी अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांच्यासह सर्व विभागाचे कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी परिश्रम घेतले.  

COMMENTS