देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू विक्री व निर्मिती करणार्या तीन जणावर छापा टाकुन 2 लाख 42
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू विक्री व निर्मिती करणार्या तीन जणावर छापा टाकुन 2 लाख 42 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून मुद्देमालातील 1लाख 75 हजार 200 रुपये किमंतीचे कच्चे रसायन राहुरी पोलिसांनी नष्ट केले. असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत देवळाली प्रवरा पोलिस चौकीच्या पोलिसांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथिल वडार गल्लीत अवैध हातभटटीची दारु बनत असल्याची गुप्त मिळाल्याने पोलीस निरीक्षक डांगे यांनी देवळाली प्रवरा पोलिस चौकीच्या पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावेळी पो.हे.को. संतोष राठोड,पो.काँ.शशिकांत वाघमारे,प्रमोद ढाकणे,नदिम शेख,सचिन बर्डे,सचिन ताजने,मंजुश्री गुंजाळ,रवींद्र कांबळे,दादासाहेब रोहकले,प्रवीण अहिरे,आदिनाथ चेमटे आदी सहभागी झाले होते. तीन ठिकाणी छापा टाकुन एकूण 2 लाख 42 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 1लाख 75 हजार 200 रुपये किमंतीचे कच्चे रसायन राहुरी पोलिसांनी जागेवर नष्ट केले. यावेळी देवळाली प्रवरा येथिल बापु भास्कर गायकवाड यांच्याकडून 1 लाख 13 हजार 400 रुपये किंमतीची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यामध्ये 22500 रुपये किमंतीची 150 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू,88,000 रुपये किंमतीचे 200 लिटर गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे कच्चे रसायन, 1500 रुपये किमतीची 20 क्वार्टर टँगो देशी दारू,1400/- रुपये किमतीच्या 20 बॉबी संत्रा देशी दारू च्या क्वार्टर असा मुद्देमाल मिळाला असुन पो.काँ.शशिकांत उद्धव वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन गु.र.न.116/2023 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ )(क)(ड)(फ) प्रमाणे दाखल करण्यात आला.पुढील तपास पो.हे.काँ.प्रभाकर शिरसाठ हे करीत आहे. गोरख बबन गायकवाड रा.देवळाली प्रवरा याच्याकडे 20 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यामध्ये 13500 रुपये किंमतीची 90 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू,7200 रुपये किमंतीचे 90 लिटर गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. गु.र.न. 117/2023 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ )(क)(ड)(फ) प्रमाणे दाखल करण्यात आला.पुढील तपास पो.हे.काँ.संतोष राठोड हे करीत आहेत. शंकर राजाराम गायकवाड रा. देवळाली प्रवरा याच्याकडून 1 लाख 08 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.त्यामध्ये 7 हजार 500 रुपये किंमतीचे 50 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू,80 हजार रुपये किमतीचे 1000 लिटर गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.गु.र.न. 118/2023 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ )(क)(ड)(फ) प्रमाणे दाखल करण्यात आला पुढील तपास पो.हे.काँ.एन. एल. भिताडे हे करीत आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनःशाम डांगे यांनी केली आहे.
COMMENTS