पाथर्डी : शारदीय नवरात्र उत्सव काळात मोहटा देवीच्या दानपेटीत 2 कोट 37 लाख 79 हजार 909 रुपयांची रक्कम दानपेटीत जमा झाली असून मागील नवरात्र उत्सव क
पाथर्डी : शारदीय नवरात्र उत्सव काळात मोहटा देवीच्या दानपेटीत 2 कोट 37 लाख 79 हजार 909 रुपयांची रक्कम दानपेटीत जमा झाली असून मागील नवरात्र उत्सव काळात जमा झालेल्या रकमेपेक्षा ही रक्कम जास्त आहे. चालू वर्षी झालेला समाधानकारक पाऊस अन विधानसभा निवडणूक या मुळे चालूवर्षी घसघशीत वाढ झाली असल्याचे मानले जात आहे.
3 ऑक्टो. ते 17 ऑक्टो 24 या काळात शारदीय नवरात्र उत्सव पार पडला.मुख्य मंदिराचे काम पूर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही देवीचे दर्शन कमी वेळात व सुलभतेने घेता येत असल्याने दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढीस लागली होती.त्यातच विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने राज्यातील अनेक नेतेमंडळींनी आपल्या मतदारसंघातील महिलांना पदरमोड करत देवीचे दर्शन घडवल्याने भाविकांची मोठी गर्दी दररोज गडावर दिसून येत होती. देवस्थान समितीकडून सुद्धा यात्रेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते.काल गुरुवारी देवस्थानच्या दानपेट्या जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे, दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त मयूर पवार, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, बाळासाहेब दहिफळे, श्रीराम परतानी, ऍड कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, ऍड विक्रम वाडेकर, योगेश भागवत, देवस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, राजेंद्र शेवाळे, देवस्थान संचलित विद्यालयातील शिक्षक, सेंट्रल बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत रोकड मोजण्यात आली. त्यामध्ये 22 लाख 87 हजार 488 रुपयांचे सोने,12 लाख 6 हजार रुपयांची चांदी,वस्तू रूपात 9 लाख 12 हजार रुपये तर ऑनलाइन व रोकड स्वरूपात एकूण दोन कोट 37 लाख, फा79 हजार 909 रुपयांची रक्कम दानपेटीत जमा झाली आहे.नवरात्र उत्सव संपला असला तरीही सध्या राज्यातील अनेक मतदारसंघातून महिलांनी भरलेल्या लक्झरी बसेस देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने पाथर्डी शहरातील व मोहटा देवीगडावर असलेल्या व्यापार्यांचा चांगला व्यवसाय होत असल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS