Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावे : पोलिस निरीक्षक जाधव

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरणाऱ्या नागरिकांसाठी मास्क वापराबाबत दंडात्मक कारवाई बरोबर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
बेसुमार पाणी वापरणाऱ्यांनी किमान दहा पट तरी पाणी पट्टी भरावी : वाहडणे
एसटी बस कंडक्टरच्या तिकिटाच्या पेटीची चोरी

कोपरगाव शहर प्रतिनिधी- : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरणाऱ्या नागरिकांसाठी मास्क वापराबाबत दंडात्मक कारवाई बरोबर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होवून  नियमित मास्क वापरावे.असे आवाहन कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.

कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन  आणि सूर्यतेज संस्था कोपरगाव यांचे वतीने सार्वजनिक खरेदी विक्री केंद्रावर मास्क वापरणे संदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.तशा आशयाचे जनजागृती भित्ती पत्रक तयार केले आहे.
कोरोना नियंत्रण मोहिमेचा एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे हद्दीत मास्क न वापरणे तसेच कोरोना नियंत्रणासाठी शासनाचे नियम न पाळणारे यांचेवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.या सोबत जनजागृतीचे भित्ती पत्रक कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे हद्दीतील आस्थापना, सार्वजनिक खरेदी विक्री केंद्रावर तसेच इतरही सार्वजनिक केंद्रावर चिकटले जात आहे.या स्टिकर वर  मास्क वापरा,No Mask No Entry,कोरोनासे जंग अभी जारी है | मास्क ठिक से पहनना सबकी जिम्मेदारी है | अशा आशयाचा मजकूर आणि प्रबोधन चित्र छापण्यात आले आहे.
कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके यांचे हस्ते “मास्क वापरा” जनजागृती स्टिकर चे प्रकाशन करण्यात आले.या प्रसंगी पोलिस हवालदार प्रदिप काशिद, राजेंद्र म्हस्के, पोलीस काॅन्स्टेबल जयदिप गवारे,अंबादास वाघ, गोपनीय शाखेचे युवाराज खुळे यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना नियंत्रणासाठी मास्क  सर्व नागरिकांनी वापरणे बंधनकारक आहे.नाक व तोंड पुर्ण झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरावे.तसेच लस घेतलेले,कोरोना संसर्ग पुर्ण बरा झालेल्या सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक असल्याने श्री.जाधव यांनी सांगितले.कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी सहभागी होवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS