Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यात वीज पडल्याने 2 म्हैशीचा मृत्यू

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वनकुसवडे पठारावर वाटोळे गावालगत काळवंड नावाच्या शिवारात शुक्रव

राष्ट्रवादीचा इस्लामपूर बाजार समितीवर 17-1 ने दणदणीत विजय
क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची कामे तातडीने सुरू : ना. जयंत पाटील
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वनकुसवडे पठारावर वाटोळे गावालगत काळवंड नावाच्या शिवारात शुक्रवारी वीज पडल्याने यात 2 म्हैशींचा मृत्यू झाला आहे. शेतकरी धोंडीबा विठ्ठल पवार यांच्या हाताला व पायाला किरकोळ भाजल्याने यातून ते बचावले आहेत. याचा पंचनामा गावकामगार तलाठी एस. जी. बोबडे व तलाठी पन्हाळकर यांनी केला असून यात शेतकर्‍याचे सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पाटणपासून काही अंतरावर वनकुसवडे पठारावर देखील जोरदार वळीवाच्या पावसाने कहर केला. सुमारे दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पठारावरील वाटोळे गावानजीक काळगवंड नावाच्या शिवारात शुक्रवार, दि. 8 रोजी धोंडीबा विठ्ठल पवार (वय 50) हे आपली जनावरे घेवून चारावयास गेले होते. सायंकाळी 5 वाजता घरी परतत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी काही जनावरे फणसाच्या झाडाखाली थांबली तर काही जनावरे पुढे गेली. यावेळी जनावरांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यातील 2 म्हैशींचा जागीच मृत्यू झाला. शेतकरी धोंडीबा पवार यांच्या हाताला व पायाला किरकोळ भाजले आहे. नशीब बलवत्तर म्हणून यातून ते थोडक्यात बचावले.
या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी एस. जी. बोबडे व तलाठी पन्हाळकर यांनी केला आहे. यात संबंधित शेतकर्‍याचे 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, धोंडीबा पवार यांनी पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले.

COMMENTS