Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी लोकन्यायालयात 186 प्रकरणे तडजोडीअंती निकाली

देवळाली प्रवरा ः राहुरी न्यायालयात लोकन्यायालयात फौजदारी व दिवाणी न्यायालयातील 1 हजार 245 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 186 प्रक

सुरेगाव ग्रामपंचायत साजरा करणार 65 वा वर्धापन दिन
प्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’ LokNews24
चाळीसगावच्या दिंडीत…रंगला रिंगण सोहळा

देवळाली प्रवरा ः राहुरी न्यायालयात लोकन्यायालयात फौजदारी व दिवाणी न्यायालयातील 1 हजार 245 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 186 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. तर विविध बँका,पतसंस्था, ग्रामपंचायत यांचे दाखल व दाखल पूर्व 3 हजार 734 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली त्यापैकी 1 हजार 729 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 1 कोटी 12 लाख 55 हजार 858/- रुपयाचा  लोकन्यायालयातून वसूल झाला आहे.
                राहुरी लोकन्यालयात तीन पॅनल करण्यात आले होते. राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश असावरी वाडकर यांनी कामकाज पाहिले.त्यांना कार्यालयीन क्लर्क म्हणून जयश्री बोडखे,दिलीप कुलकर्णी, संतोष तवूर,प्रशांत क्षीरसागर यांनी तर पंच म्हणून ड.विशाल होले यांनी कामकाज पाहिले. पॅनल नंबर दोन चे कामकाज राहुरी न्यायालयाच्या सह.दिवाणी. न्यायाधीश  रुपाली तापडिया यांनी पाहिले.त्यांना  कार्यालयीन क्लर्क म्हणून चंद्रकांत गुळवे,जावेद शेख,ज्योती गाली यांनी  पंच म्हणून ड.संतोष साळुंके यांनी काम पाहिले. तीन नंबर पॅनल चे कामकाज सह दिवानी न्यायाधीश मयूरसिंह गौतम यांनी पाहिले. त्यांना कार्यालयीन क्लर्क म्हणून प्रतीक पळशीकर,शिवाजी चांडोले,स्वप्नील परदेशी,ज्ञानेश्‍वर भगत, लीगल विभागाचे विकास जाधव यांनी कामकाज पाहिले. पंच म्हणून ड.संजय कदम यांनी कामकाज पाहिले.  तीनही पॅनल मिळून फौजदारी व दिवानी न्यायलयातील दाखल व दाखल पूर्व  1 हजार 245 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले. त्यापैकी तडजोड घडवून 186 प्रकरणे निकाली काढण्यात आली. बँका,पतसंस्था, ग्रामपंचायत यांचे दाखल व दाखल पूर्व  3 हजार 734 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.त्यापैकी 1 हजार 729 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.यातुन  36 लाग 98 हजार 216/- रुपयाचा वसूलगोळा झाला.तिन हि पँनल मधील दाखल व दाखल पूर्व प्रकरणातून  1 कोटी 12 लाख 55 हजार 858/- रुपयाचा महसुल  वसूल करण्यात आला. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी राहुरी तालुका बार असोसिएशन चे सर्वच आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व सदस्य, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकन्यायलयात लाभधारक पक्षकार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

COMMENTS