18 जिल्ह्यांत निर्बंध पूर्णतः शिथील ; आजपासून अंमलबजावणी; लग्नासह अन्य समारंभावरील बंधने उठविली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

18 जिल्ह्यांत निर्बंध पूर्णतः शिथील ; आजपासून अंमलबजावणी; लग्नासह अन्य समारंभावरील बंधने उठविली

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने टाळेबंदी लागू केली होती.

आता एकनाथ शिंदे झाले शिवसेनेचे गटनेते ? आमदारांनी केली घोषणा | LokNews24
जय बाबाजी भक्त परिवाराच्या तीर्थ कलशाचे अयोध्येकडे प्रस्थान 
कल्लोळ घालायला येतोय ‘लग्न कल्लोळ’  

मुंबई / प्रतिनिधी: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने टाळेबंदी लागू केली होती. या टाळेबंदीमधून आता हळूहळू राज्यातील जनता बाहेर पडत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णवाढीचा दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यांच्या आधारावर राज्यातील जिल्ह्यांची पाच विभागात वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या लेव्हलपासून ते पाचव्या लेव्हलपर्यंत टाळेबंदीचे नियम हळूहळू कडक होत जातील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पहिल्या लेव्हलमधील जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे, तर पाचव्या लेव्हलमध्ये कडक टाळेबंदी कायम असणार आहे. 

परिस्थितीचे अवलोकन करून काही जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अंशत: शिथिलता देण्याचा विचार अंतिम करण्यात आला आहे. पाच टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि 25 टक्क्यांच्या आतील ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी यांच्या आधारावर लेव्हल एकमधील जिल्हे ठरवण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये रेस्टारन्ट्स, मॉल्स, सायकलिंग, वॉकिंग ट्रॅक, कार्यालये, क्रीडा संकुले, सिनेमागृहे, मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम (200 जणांच्या मर्यादेसह), सामाजिक कार्यक्रम, या सर्व गोष्टींना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जसजशी जिल्ह्याची लेव्हल बदलत जाईल, त्यानुसार काही गोष्टींवर बंधने येतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. संचारबंदीचे नियम पहिल्या लेव्हलच्या जिल्ह्यांना लागू राहणार नाही; पण दुसर्‍या लेव्हलपासून हे नियम काही अंशी पाळणे गरजेचे आहे. ब्युटी पालर्स, सलूनला पहिल्या लेव्हलला परवानगी असेल. दुसर्‍या लेव्हलला 50 टक्के क्षमतेने हा सुविधा पुरवता येतील. बस सुविधा, आंतर जिल्हा प्रवास याचीदेखील लेव्हलनुसार नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे. पहिल्या लेव्हलमधील सर्व वाहतूक व्यवस्था सुरू राहतील. दुसर्‍या लेव्हलमधील मुंबई लोकलची सुविध सध्या तरी बंद असेल; पण आठवड्याभरात ही सेवा सुरू होऊ शकते. दुसर्‍या आणि तिसर्‍या लेव्हलमध्ये असलेल्या जिल्ह्यांना बससेवा मिळेलच पण रेडझोनमधील जिल्ह्यांना मात्र कडक टाळेबंदी पाळावाच लागेल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. आंतरराज्य प्रवासासाठी आता आरटीपीसीआर चाचणीची गरज लागणार नाही. सर्व प्रकारच्या नियमांची अंमलबजावणी उद्यापासूनच करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. दर शुक्रवारी जिल्ह्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील जिल्हे : ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, धुळे, गोंदिया, लातूर, नागपूर, नांदेड, चंद्रपूर, नाशिक, परभणी, गडचिरोली, जालना, जळगाव

काय सुरू होणार? : रेस्टॉरंट्स, मॉल्स, मैदाने, वॉकिंग ट्रॅक्स, खासगी आणि सरकारी कार्यालये शंभर टक्के क्षमतेने टक्के सुरू, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना परवानगी, जीम, सलून, आंतरजिल्हा प्रवास, ई-कॉमर्स सुविधा

दुसर्‍या टप्प्यातील जिल्हेः मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली

काय सुरू होणार? ः 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट्स, 50 टक्के क्षमतेने म़ॉल्स, थिएटर्स, सार्वजनिक जागा, मैदाने वॉकिंग ट्रॅक पूर्णपणे सुरू, बांधकामे, कृषीविषयक कामे पूर्णपणे सुरू, जीम, सलून 50 टक्के क्षमतेने सुरू, एसटी पूर्ण क्षमतेने सुरू, जिल्ह्याबाहेर जायला परवानगी; मात्र पाचव्या टप्प्यातल्या जिल्ह्यात जायचे असेल तर पास काढावा लागणार.

तिसर्‍या टप्प्यातील जिल्हेः अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर.

काय सुरू राहणार? अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी 7 ते 2, इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 (शनिवार, रविवार बंद)

चौथ्या टप्प्यातील जिल्हेः पुणे, रायगड

चौथ्या टप्प्यातल्या जिल्ह्यांसाठीचे निर्बंध कायम राहतील.

COMMENTS