Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 17 जण जखमी

भावनगर ः गुजरातमधील भावनगर शहरात बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे तख्तेश्‍वर मंदिराजवळ इमारतीची दुमजली बाल्कनी कोसळली. त्याच्या ढिगार्‍य

अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात 172 दहशतवाद्यांचा खात्मा
हकनाक बळी !

भावनगर ः गुजरातमधील भावनगर शहरात बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे तख्तेश्‍वर मंदिराजवळ इमारतीची दुमजली बाल्कनी कोसळली. त्याच्या ढिगार्‍यात एका बँकेसह 10 दुकाने जमीनदोस्त झाली. ढिगार्‍याखाली दबून 17 जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी एक व्यक्ती या ढिगार्‍याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीच्या खाली बँक ऑफ बडोदाच्या शाखेसह 10 हून अधिक दुकाने आहेत. अपघाताच्या वेळी येथे सुमारे 20 लोक उपस्थित होते, त्यापैकी एक जण ढिगार्‍याखाली दबला गेल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली 5 ते 6 जण दबले गेल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे.

COMMENTS