Homeताज्या बातम्याविदेश

गाझापट्टीवरील धुमश्‍चक्रीत 1600 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या 11 तर ब्रिटनच्या 10 नागरिकांचा मृत्यू

तेल अवीव/वृत्तसंस्था ः इस्त्रायलवर गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तर इस्त्रायलनेही

कर्जतमध्ये पोलिसांवर उचलला हात
मार्केट यार्ड चौकात कोरोनारुपी रावणाचे दहन
दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं !

तेल अवीव/वृत्तसंस्था ः इस्त्रायलवर गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तर इस्त्रायलनेही या हल्ल्यांचा प्रतिकार करतांना अनेक ठिकाणी रॉकेट डागले आहेत. या युद्धात आतापर्यंत 1600 हून अधिक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी सलग चौथ्या दिवशी दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरूच असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इस्रायली लष्कराने गाझा सीमेवर कब्जा केल्याचे जाहीर केले आहे. गाझामधील 200 ठिकाणांना एका रात्रीत लक्ष्य केल्याचे लष्कराने सांगितले. आतापर्यंत हमासचे 1500 सैनिक मारले गेले आहेत. युद्धात आतापर्यंत सुमारे 123 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, युद्धाच्या दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमासने आमच्यावर हल्ला करून सर्वात मोठी चूक केली आहे. हमास आणि इस्रायलच्या इतर शत्रूंच्या अनेक पिढ्या अनेक दशकांपर्यंत लक्षात ठेवतील अशी किंमत आम्ही निश्‍चित वसूल करू. आम्हाला युद्ध नको होते. हे आमच्यावर अतिशय क्रूर पद्धतीने लादण्यात आले. आम्ही युद्ध सुरू केले नसेल, परंतु आम्ही ते संपवू. इस्रायल केवळ आपल्या लोकांसाठी नाही तर बर्बरतेच्या विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक देशासाठी लढत असल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.  दरम्यान, या युद्धात दोन्ही बाजूच्या 1600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गाजा पट्टीत आतापर्यंत 704 लोक मारले गेले आहेत. यामध्ये 143 लहान मुलं आणि 105 महिलांचा समावेश आहे. तसेच गाजा पट्टीत 4,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात 900 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2,600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्रायली सरकारने आपल्या सैन्याला संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. इस्रायलने गाझा सीमेवर 1 लाख सैनिक तैनात केले आहेत. तसेच 3 लाख सैनिकांना तयार राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनीही गाझा पट्टीला अन्न, पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा थांबवण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. इस्रायलमध्ये मरण पावलेल्या अमेरिकन नागरिकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. त्याचवेळी 10 ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी फ्रान्स, जर्मनी आणि युक्रेननेही हमासच्या हल्ल्यात आपल्या नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. मात्र, लष्कराने सीमेवरील इस्रायलचे भाग हमासच्या लढवय्यांपासून मुक्त केले आहेत.

ओलिसांना ठार मारण्याची हमासची धमकी – हमास या दहशतवादी संघटनेने 150 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झाली आहे. गाझा पट्टीचा बराचसा भाग इस्रायली सैन्याने आता आपल्या ताब्यात घेतला आहे. अशातच हमासने 150 ओलिसांना ठार करण्याची धमकी दिली आहे. एकीकडे हमासने इस्रायलला ओलिसांना ठार मारू अशी धमकी दिली आहे. 

COMMENTS