Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एटीएम कार्ड बदली करून 16 हजारांची फसवणूक

नाशिक प्रतिनिधी- एटीएम कार्ड बदली करून वृद्धाच्या बँक खात्यातील 16 हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना घडली. फिर्यादी दादा नामदेव गांगुर्ड

‘ऑनलाइन टास्क’ देत तब्बल 200 कोटींचा गंडा
पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा
 पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषातून 21 लाख 24 हजारांची फसवणूक

नाशिक प्रतिनिधी- एटीएम कार्ड बदली करून वृद्धाच्या बँक खात्यातील 16 हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना घडली. फिर्यादी दादा नामदेव गांगुर्डे (वय 63, रा. समृद्धनगर, त्र्यंबक रोड, सातपूर) हे दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सावरकरनगर येथील आशीर्वाद मेडिकलजवळ असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे आलेल्या दोन अज्ञात इसमांनी संगनमत करून गांगुर्डे यांच्या हातातील एटीएम कार्ड बदली करून त्या कार्डाद्वारे 16 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.

COMMENTS