Homeताज्या बातम्याशहरं

सातार्‍यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्‍या 16 जणांना अटक

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील रस्त्यावर, चौकात गेल्या काही दिवसपासून टवाळखोर वाढदिवस साजरा करताना रस्त्यावर केक कापूर धुडगुस घालण्याचे प्रक

विशेष रस्ता अनुदानाच्या 11 कोटीला नगरविकासची स्थगिती; इस्लामपूरात श्रेयवादाचे राजकारण पेटले
युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होवून लोकशाही बळकट करावी : शेखर सिंह
सैनिक स्कूलच्या नूतनीकरणाचे काम वेळेत गुणवत्तापूर्ण करावे : ना. बाळासाहेब पाटील

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील रस्त्यावर, चौकात गेल्या काही दिवसपासून टवाळखोर वाढदिवस साजरा करताना रस्त्यावर केक कापूर धुडगुस घालण्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी सातारा शहरातील सदरबझार येथील सुमित्राराजे उद्यानासमोर रस्त्यावर गर्दी करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी 16 जणाविरूध्द गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदरबझार या भागात रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व दोन बीट मार्शल पेट्रोलिंग करत होते. यावेळी सुमित्राराजे उद्यानाच्या समोर ऋतिक जितेंद्र शिंदे (रा. गोडोली), अक्षय सुनिल जाधव (रा. करंजे), सागर चंद्रकांत साळुंखे (रा. कृष्णानगर खेड), प्रितम अनिल चव्हाण (रा. जुना आरटीओ चौक), दिनेश राजेंद्र निकम (रा. विकासनगर खेड), सुरज शंकर साळुंखे (रा. तडवळे, ता. कोरेगाव), संकेत प्रल्हाद शिंदे (रा. रणशिंगवाडी, ता. खटाव), पुरूषोत्तम नारायण भोसले (रा. विकासनगर खेड), अक्षय संजय जातक (रा. वर्णे, ता. सातारा), प्रविण अशाक खडपद (रा. सदरबझार), गौरव पांडुरंग मोरे (रा. कारी, ता. सातारा) व 5 ते 6 जण रस्त्यावर मोटार सायकल उभी करून केक कापत होते. हे लक्षात येताच पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी नियमांचे उल्लघंन करणार्‍या 16 जणांना ताब्यात घेत त्यांची 9 वाहने जप्त केली आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS