Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

१६ ग्रामपंचायत कर्मचारी यांना पदोन्नतीने जिल्हा परिषद सेवेत पदस्थापना

नाशिक : ग्रामपंचायत कर्मचा-यांमधुन १०% टक्के आरक्षणाने जिल्हा परिषद नाशिक, सेवेतील वर्ग ३ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार रिक्त असलेल्या विविध पद

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल l LokNews24
राजकिशोर मोदी यांच्या उपस्थितीत सिमेंट रस्ता व इतर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ
 जळगाव मधील एका कार्यक्रमात अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची हजेरी  

नाशिक : ग्रामपंचायत कर्मचा-यांमधुन १०% टक्के आरक्षणाने जिल्हा परिषद नाशिक, सेवेतील वर्ग ३ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार रिक्त असलेल्या विविध पदांवर नियुक्ती देण्यात आलेली आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिया मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०४.०३.२०२४ रोजी समुपदेशनाने नियुक्ती प्रक्रिया पार पडली. समुपदेशनाने पारदर्शक रितीने नियुक्ती प्रक्रिया पार पाडल्यामुळे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिना मित्तल यांचे नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ, महाराष्ट्र राजा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. ग्रामपंचायत कर्मचारी यांना खालील विविध पदांवर नियुक्ती दिल्याने त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

शैक्षणीक अर्हतेनुसार पात्र असलेले ग्रामपंचातय कार्मचारी यांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने वरील पदावर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले. सदर प्रक्रियेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्री. रवींद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) डॉ. श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. योगेश पाटील, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. राजेंद्र बागुल, लेखाधिकारी श्री. रमेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत पवार सहायक गटविकास अधिकारी (प्रापं), श्री रविंद्र आंधळे, सहायक प्रशासन अधिकारी, श्री. निवृत्ती बगड कनिष्ठ प्रशासन अधिकारी, श्री, अशोक आहिरे (प्रभारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी तथा बरिष्ठ सहायक), श्री. स्टीव्हन शहाबंद्री वरिष्ठ सहाय्यक, श्री. योगेश बोराडे कनिष्ठ सहायक यांनी पदोन्नती कामी परिश्रम घेतले.

1. कंत्राटी ग्रामसेवक-०८

2. आरोग्य सेवक (पुरुष) ०६

3. वरिष्ठ सहाय्यक लिपोक-०१

4. अंगणवाडी पर्यवेक्षिका – ०१

COMMENTS