Homeताज्या बातम्या

पाटण तालुक्यातील 159 पोलीस पाटील रिक्त पदांची आरक्षण सोडत जाहीर

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील 159 रिक्त पोलीस पाटील पदासाठीचे आरक्षण सोडत रविवार, दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता म्हावशी, ता. पाटण येथील सुस्वाद मल

25 तलाठी कार्यालयांसाठी 5.33 कोटींची निविदा प्रसिद्ध
आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे
पठाण फिल्मच्या निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी – राम कदम 

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील 159 रिक्त पोलीस पाटील पदासाठीचे आरक्षण सोडत रविवार, दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता म्हावशी, ता. पाटण येथील सुस्वाद मल्टीपर्पज हॉलमध्ये चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. दि. 23 फेब्रुवारी ते दि. 4 मार्च अखेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे. यावेळी तहसिलदार रमेश पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, नायब तहसीलदार मुलाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गासाठी 27 गावे, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 23 गावे, विशेष मागास महिला प्रवर्गासाठी 3 गावे, विमुक्त जाती अ महिला प्रवर्गासाठी 8 गावे, भटक्या जमाती ड महिला प्रवर्गासाठी 7 गावे, इतर मागास महिला प्रवर्गासाठी 31 गावे, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 40 गावे अशा प्रकारे पाटण तालुक्यातील रिक्त असलेल्या 159 गावातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आले आहे. आरक्षण सोडत प्रक्रियेकामी मंडलाधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी यांनी काम पाहिले. यावेळी संबंधित गावातील सरपंच व नागरीक उपस्थित होते. भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या निकषांची यादी उपविभागीय कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छूक पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे.

COMMENTS