Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयभिम महोत्सवात 132 रक्तदात्यांचे रक्तदान

रक्तदानाने गरजवंत रूग्णांचे प्राण वाचविण्याचे काम केले :डॉ.सुरेश साबळे

बीड प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवार (दि.10) एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा

बिग बॉस मराठीच्या घराचे दरवाजे लवकरच उघडणार!
घोसाळकर हत्येप्रकरणात दोघांना अटक
इंडियातील जागावाटपांचा घोळ

बीड प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवार (दि.10) एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा रक्तदान शिबीराचा कार्यक्रम शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे आयोजित करण्यात आला होता. यात 132 रक्तदात्यांनी रक्तदान करत गरजवंत रूग्णांचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे. असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केले.
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाणे (दि.11) एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पफुले अर्पण करून मान्यवरांच्या  हास्ते करण्यात आले.यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते, संपादक बाळासाहेब मस्के, किसन तांगडे,यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच रक्तदान शिबीर समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे अनेक गरजवंत  रूग्णांचे प्राण वेळोवेळी वाचवले जावू शकतात.दिवसेंदिवस रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे.  या रक्तदान शिबीरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. या रक्तदानाच्या शिबीरासाठी जिल्हा रूग्णालयातील ब्रदर राजेंद्र अवसरमल, टेक्निशियन सुनिल गायकवाड, सचिन सत्कार, संतोष गायकवाड, दिलिप अवसरमल, दादाराव कुमकर यांनी रक्तदानाची वैद्यकिय जबाबदारी पार पाडली. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि वाघमारे, आभार मनोज वाघमारे यांनी मानले. हा रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच रक्तदान शिबीर समिती यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

COMMENTS