Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिफ्टमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक बंद होऊन घडलेल्या दुर्घटनेत 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाचा गळा अडकल

हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट – अंबादास दानवे
अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
ड्रग्ज प्रकरणात आमदार-खासदारांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक बंद होऊन घडलेल्या दुर्घटनेत 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाचा गळा अडकल्याने तो कापला गेल्याचा प्रकार घडला आहे. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कटकट गेट भागात असणार्‍या हयात हॉस्पिटलजवळच्या इमारतीत त्याचे आजी आजोबा राहतात. रविवारी रात्री साकीब तिसर्‍या मजल्यावर खेळत होता. त्यावेळी तो लिफ्टमध्ये गेला अन् लिफ्ट सुरू केली. तेव्हा दरवाजा बंद होत असताना बाहेर पाहताना त्याचा गळा दरवाजात अडकला, यातच त्याचा मृत्यू झाला.

COMMENTS