Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल

पुणे/प्रतिनिधी : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 28 ऑगस्ट) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन

लस घ्या, बाकरवाडी न्या! लसीकरण वाढण्यासाठी अनोखी योजना
ठाण्यात दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात
पुणे प्रादेशिक सा.बां.विभागात मुख्य अभियंता यांचा आर्थिक धुडगूस

पुणे/प्रतिनिधी : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 28 ऑगस्ट) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेतली. अतिवृष्टीमुळे तीन परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा घ्यावी लागली. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (28 ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. हीींिं://ुुु.ारहरीर्शीीश्रीं.पळल.ळप या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील, या माहितीची प्रत घेता येईल. निकालानंतर गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

COMMENTS