हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्यामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक गावकर्यांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकि

हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्यामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक गावकर्यांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गावातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तातडीने गावात आरोग्य पथक पाठवून गावात उपचाराची व्यवस्था केली आहे. कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे मागील पाच दिवसांपासून धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमात सायंकाळी भगर व शेंगदाण्याची चटणी देण्यात आली होती. त्यासाठी सोडेगाव येथील दुकानातून भगर आणण्यात आली होती.
COMMENTS