Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात

मुंबई : संपूर्ण मुंबईत आज सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर असे तेरा दिवस ही प

लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री शिंदे
‘स्वामित्व’ योजनेद्वारे ग्राम सक्षमीकरण होवून अर्थव्यवस्था बळकट होणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
BREAKING: महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलं Weekend Lockdown | What Is Weekend Lockdown? | LokNews24

मुंबई : संपूर्ण मुंबईत आज सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर असे तेरा दिवस ही पाणी कपात असेल. त्यामुळे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणार्‍या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणार्‍या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे.

COMMENTS