धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी राष्ट्रीय महामार्ग ३० वर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. बोलेरो आणि ट्रकच्या अपघात १० जणांचा जागीच मृत्यू झाला. नशीब ब
धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी राष्ट्रीय महामार्ग ३० वर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. बोलेरो आणि ट्रकच्या अपघात १० जणांचा जागीच मृत्यू झाला. नशीब बलवत्तर म्हणून एक चिमुकली या अपघातातून बचवली आहे. अपघातग्रस्त बोलेरोतील प्रवासी हे एका लग्नावरून परत येत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. या अपघाताची माहिती मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी चिमुकली लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली, तर अपघातात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा अपघात बुधवारी रात्री झाला. लग्नाहून परत येत असतांना एका बोलेरोला भरधाव ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला. धमतरी, कांकेर राष्ट्रीय महामार्गावरील जगत्राजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात सायंकाळी उशिरा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोलेरो गाडी कापून मृतदेह बाहेर काढण्याची वेळ आली आहे. जखमी चिमूकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भीषण अपघात छत्तीसगडमधील धमतरी इथे बुधवारी रात्री झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी चिमुकली लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली, तर अपघातात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.
COMMENTS