Homeताज्या बातम्यादेश

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हे हेलिकॉप्टर येथील चिनाब नदीत कोसळलं असून तातडीने बचावकार्य सु

प्रियांका आणि निम्रितमध्ये पुन्हा पेटला वाद
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई l LokNews24
बस दरीत कोसळून 11 ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हे हेलिकॉप्टर येथील चिनाब नदीत कोसळलं असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात जीवित हानी झाल्याचं वृत्त नाहीये. मात्र, नदीत हेलिकॉप्टर कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. ज्या किश्तावाडा परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय तो अत्यंत दुर्गम परिसर असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्गम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थांबून थांबून पाऊस पडत होता. या हेलिकॉप्टरमधून लष्कराचे तीन अधिकारी जात होते. पाऊस आणि खराब हवामानामुळे विमान क्रॅश झालं. याची काहीच माहिती सुरुवातीला मिळत नव्हती. रेस्क्यू टीम घटनास्थळी पाठवली गेली आहे. तर स्थानिक लोक बचावकार्य करत आहेत.

COMMENTS