Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

ऊस उत्पादनात घट : अनेक कारखान्याचे देयके प्रलंबित

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून दहा लाख टनाहून अधिक ऊस राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर सह विविध साख

राहाता सहकारी पतसंस्थेने सभासदांना केले 15 टक्के लाभांश वाटप
कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा – ना. बाळासाहेब थोरात
बाजार समित्यांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून दहा लाख टनाहून अधिक ऊस राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर सह विविध साखर कारखान्यांनी तोडून नेला, तर राहुरीतील एकमेव सुरू असलेला खाजगी कारखाना प्रसाद शुगरने सव्वा पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

यंदाच्या वर्षी 15 ते 20 टक्के उसाची सरासरी उत्पादन क्षमता कमी झाल्याने ऊस उत्पादकांवरील संकट कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे . उसाचे आगर मानल्या जाणार्‍या राहुरी तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी सुमारे 13 ते 14 लाख मेट्रिक टन उपलब्ध होता. तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखानाचे गाळप यंदा विविध कारणांनी झाले नव्हते. मात्र एकमेव खाजगी साखर कारखाना प्रसाद शुगर नोव्हेंबर अखेरीस सुरू झाला. तनपुरे साखर कारखाना सुरू न झाल्याने या कारखान्याला ऊस देणार्‍या उत्पादकांना आपला ऊस अन्यत्र साखर कारखान्यांना द्यावा लागला. शिवाय यंदाचा पावसाळी हंगाम उशिरापर्यंत सुरू असल्याने अगदी दिवाळीच्या काळात देखील उसाच्या क्षेत्रामध्ये पाणी साचून राहिल्याने, उसाची कार्यक्षमता व  उत्पादनक्षमता यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज शेतकर्‍यांसह साखर कारखानदारीतील तज्ञांनी व्यक्त केला होता. तीन ते चार महिने उसामध्ये पाणी साचून राहिल्याने उसाची कार्यक्षमता कमी तर झाली, याशिवाय उसाची पूर्ण वाढ देखील न झाल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना ऊस तुटून गेल्यानंतर लक्षात आले. साधारणतः 15 ते 20 टक्के उसाच्या उत्पादनात घट झाल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी एकरी 50 ते 60  टन उत्पादन झालेल्या उसाचे यावेळी 30 टन उत्पादन झाल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडले आहे. राहुरी तालुक्यात बाहेरील दहा ते बारा साखर कारखान्यांनी ऊस तोडून आपल्या कारखान्यांमध्ये गाळप केला.

यंदा जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने राहुरी कडे काही साखर कारखान्यांनी हेतूतहा कानाडोळा केला. याचाही विपरीत परिणाम शेतकर्‍यांना झाला. राहुरीतील एकमेव खाजगी साखर कारखाना प्रसाद शुगर यंदाच्या वर्षी सव्वा पाच लाख टन मेट्रिक उसाचे गाळप केले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापन ऊस तोडीचे नियोजन करून तसेच बाहेरील काही प्रमाणात ऊस आणून आपल्या कारखान्यात उसाचे गाळप केले आता. सध्या प्रसाद शुगर सह बहुतांश कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे.उसाचा हंगाम सर्वच कारखान्यांना बर्‍यापैकी गेला असला तरी डिसेंबर महिन्यापासून बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची देयके अर्थात पेमेंट केले अदा केलेले नाही. नियमानुसार ऊस उत्पादकांची देयके अर्थात पेमेंट पंधरा दिवसात देणे बंधनकारक असूनही बहुतांश कारखान्यांनी शेतकर्‍यांचे पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत साखर आयुक्तालय यांनी नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन संबंधित ऊस बिलांची देयक न देणार्‍या साखर कारखान्यांची माहिती घेऊन त्यांना लेखी तंबी द्यावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS