९ लाखांचा गांजा जप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

९ लाखांचा गांजा जप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली कारवाई

कर्जत : प्रतिनिधी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने गांजाच्या शेतीवर छापा टाकून मोठे कारवाई केली. श्रीगोंदा शिवारात प

निम्मा भारत झाला लसवंत ; राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 8 वर ! सह विविध बातम्या बघा
एकाच दिवशी दोन महापौर…आणि बदलला कायदा
अनुराधाताई पौडवाल यांना शिंगणापूर व बेलापूर भेटीचे निमंत्रण

कर्जत : प्रतिनिधी

कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने गांजाच्या शेतीवर छापा टाकून मोठे कारवाई केली. श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये हा गांजा जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

 याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३० रोजी गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती नजीक गट नंबर ७००, ७०१ यामध्ये लिंबोणीच्या झाडाच्यामध्ये गांजाची लागवड केली आहे. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलीस पथकाने श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती या ठिकाणी जाऊन छापा टाकला.

त्या ठिकाणी पोलिसांना लिंबोणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केलेली आढळून आली. त्यावेळी शेतात हजर असलेले अरुण हरिभाऊ जगताप, वय : ५६ व बाळू हरिभाऊ जगताप, वय ५९ दोघे रा. जगताप वस्ती, दत्तवाडी लोखंडेवाडी, श्रीगोंदा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस पथकासमवेत कृषी अधिकारी व व्हिडीओ चित्रण त्यांनाही पाचारण करण्यात आले होते. या छाप्यात गांजाची लहान- मोठी हिरवेगार पाला असलेली झाडे ताब्यात घेण्यात आली. यामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस अंमलदार केशव व्हरकटे, सागर जंगम, दादासाहेब टाके,अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, गणेश गाडे व आदींनी केली आहे.

COMMENTS