५५० अनाथ, गोरगरीब मुलींचे लावले विवाह… शेख खलील चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

५५० अनाथ, गोरगरीब मुलींचे लावले विवाह… शेख खलील चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार

अहमदनगर : प्रतिनिधी  मुस्लिम समाजातील गोरगरीब, अनाथ अशा मुला-मुलींचे सुमारे 550 सामुदायिक विवाह दानशूरांच्या मदतीने लावून देणारे व गरीब मुला-मुलीं

मोबाईलवर बोलताना हटकले, पतीला चक्क बॅटने बदडले…
राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ ः आ.आशुतोष काळे
मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी ज्ञानेश्‍वरी सर्वश्रेष्ठ ग्रंथ ः बिपीनदादा कोल्हे

अहमदनगर : प्रतिनिधी 

मुस्लिम समाजातील गोरगरीब, अनाथ अशा मुला-मुलींचे सुमारे 550 सामुदायिक विवाह दानशूरांच्या मदतीने लावून देणारे व गरीब मुला-मुलींचे मोफत विवाह जुळवून देणारे हाजी शेख खलील यासीन चौधरी यांना स्व. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पारनेर, नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते व माधवराव लामखडे निमगाव वाघाचे सरपंच सौ. रुपालीताई जाधव, प्रा. डॉ. गुंफाताई कोकाटे, डॉ. दिलीप पवार, रामदास भोर, आबापाटील सोनवणे आदींच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक देण्यात आले.

खलील चौधरी यांना यापूर्वी विविध 25 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. स्व. किसनराव डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पैलवान नाना किसन डोंगरे यांनी सर्व पुरस्कारार्थींचे स्वागत करून त्यांना फेटे बांधण्यात आले. चौधरी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विविध घटकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS