‘होम ग्राउंड’वरच मनसेला मोठा झटका… नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हाती बांधले ‘शिवबंधन’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘होम ग्राउंड’वरच मनसेला मोठा झटका… नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हाती बांधले ‘शिवबंधन’

प्रतिनिधी : मुंबई आगामी २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पक्ष मजबुतीसाठी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान फोडाफोडीच्या राजक

मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही… आमदार राजू पाटील
शिवसेना नेत्यांच्या चौकशांना लागणार ब्रेक..? उद्धव ठाकरे-अमित शहांची होणार भेट
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा पक्षाला “जय महाराष्ट्र’ (Video)

प्रतिनिधी : मुंबई

आगामी २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पक्ष मजबुतीसाठी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली असून शिवसेनेकडून मनसेला मोठे खिंडार पाडण्यात आले आहे. 

मनसेच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या उपाध्यक्ष सुगंधा शेट्ये यांनी प्रभाग क्रमांक ५२ च्या महिला अध्यक्ष, ८ महिला उपशाखाध्यक्ष यांच्यासह येथील अनेक महिलांनी उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अंधेरी पूर्व,विजयनगर येथील सिंम्फोनी हॉल मध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या 

पदाधिकाऱ्यांचा मेळावा स्थानिक खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी आयोजित केला होता. यावेळी हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगला .

मनसेतून शिवसेनेत आलेल्या सुगंधा शेट्ये या १९९२ ते १९९७ आणि २००२ ते २००७ पर्यंत शिवसेनेचे नगरसेवकपद भूषवले होते. त्यांनी २०१२ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. 

आता पुन्हा शिवसेनेत त्यांनी घरवापसी केली आहे . शेट्ये यांच्या प्रवेशाने शिवसेनेला अधिक बळकटी येईल, अशी चर्चा सुरु झाली .

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शेट्ये यांनी प्रतिक्रिया दिली. माझा मूळ पिंड हा शिवसेनेचा आहे. शिवसेनाप्रमुख हे माझे आराध्य दैवत आहे. राज्यात कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे परिस्थितीत हाताळली, 

ती उल्लेखनीय होती. आगामी पालिका निवडणूकीत माझ्यावर जी जबाबदारी पक्षश्रेष्ठीं टाकतील ती उत्तमरीत्या पार पाडेल, अशी प्रतिक्रिया सुगंधा शेट्ये दिली .

या पक्ष प्रवेश कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री विभागप्रमुख अँड.अनिल परब,माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र वायकर,शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, मुंबईचे 

उपमहापौर अँड.सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्ष व महिला विभागसंघटक राजुल पटेल, महिला विभागसंघटक व नगरसेविका साधना माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS