हिरेन यांच्या हत्येनंतर वाझेंचे छापा नाट्य ; एटीएसचा अहवाल एनआयएकडे; बेशुद्ध करून फेकले खाडीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिरेन यांच्या हत्येनंतर वाझेंचे छापा नाट्य ; एटीएसचा अहवाल एनआयएकडे; बेशुद्ध करून फेकले खाडीत

मनसुख हिरण यांच्या हत्येच्या वेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसने एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात व्यक्त केला आहे.

 रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
जे. जे. रुग्णालयात 43 हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार
या दिवशी रिलीज होणार ‘आदिपुरुष’चा जबरदस्त टीझर

मुंबई/प्रतिनिधीः मनसुख हिरण यांच्या हत्येच्या वेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसने एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात व्यक्त केला आहे. एटीएसच्या माहितीनुसार, मनसुख हिरेनच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरी परिसरातील टिप्सी बारवर धाड टाकण्याचे ढोंग केल्याचे या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हिरेन यांचे अपहरण करून त्यांना बेशुद्घध करण्यात आले, त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

एटीएसने अहवालात नमूद केले आहे, की मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी सचिन वाझे डोंगरीमध्ये गेले होते; मात्र त्या दिवशी वाझे यांना कॉल आला नव्हता. त्यांनी धाड टाकण्याचे फक्त ढोंग केले. एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, यामध्ये वाझे 11 वाजून 38 मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे. हिरेन यांचे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा फोन काढून घेण्यात आला. त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत फेकण्यात आला, असा अंदाजदेखील एटीएसने व्यक्त केला आहे. हिरेन प्रकरणी अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्तीने क्लोरोफॉर्म टाकले. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी, हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर मुखपट्टी होती. त्यांच्या नाकात आणि तोंडात रुमाल कोंबण्यात आले होते. एकूण पाच रुमाल त्यांच्या तोंडात खुपसण्यात आले होते. हे रुमाल रोल करण्यात आले होते.

अंबानींना दिलेल्या धमकीच्या  पत्राचे उलगडले रहस्य

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचे रहस्य उलगडले आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलियाजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेले धमकीचं पत्र स्वत: निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ठेवले होते. वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत याची कबुली दिली आहे. विनायक शिंदे यांच्या घरी सापडलेल्या एका प्रिंटरच्या माध्यमातून हे इंग्रजी पत्र तयार केले होते. ज्याचा तपास फॉरेन्सिक टीममार्फत करण्यात येत आहे. 

COMMENTS