स्वातंत्र्यदिनी 19 जणांचे देहदान संकल्प; विविध राजकीय पक्ष व संस्थांद्वारे ध्वजवंदन उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी 19 जणांचे देहदान संकल्प; विविध राजकीय पक्ष व संस्थांद्वारे ध्वजवंदन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी- भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापनदिन व अमृत महोत्सवी वर्ष प्रारंभ दिन सोहळा रविवारी (15 ऑगस्ट) नगरमध्ये उत्साहात साजरा झाला. यान

कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)
आयकर विभागाचे नुतन उपायुक्त अशोक मुराई यांचे स्वागत
अबब…! दोन महिन्यात पुल खचला

अहमदनगर/प्रतिनिधी- भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापनदिन व अमृत महोत्सवी वर्ष प्रारंभ दिन सोहळा रविवारी (15 ऑगस्ट) नगरमध्ये उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था तसेच शाळांतून उत्साहात ध्वजवंदन झाले. येथील फिनिक्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात 19जणांनी देहदान संकल्प केला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त फिनिक्स फाउंडेशनच्या पुढाकाराने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी 19 नागरिकांनी देहदानाचा संकल्प करुन अर्ज भरुन दिले. फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ.वैभव देशमुख, बाबासाहेब धिवर, वैभव दानवे, राजेंद्र बोरुडे आदी उपस्थित होते. नेत्रदान व देहदानाने आपल्या स्मृती कायम जिवंत राहतील, असा विश्‍वास यावेळी बोरुडे यांनी व्यक्त केला. देहदानाचे संकल्प पत्र भरुन देणारे हे गरजवंतांसाठी देवदूतच आहेत, असेही ते म्हणाले.

शहर काँग्रेसचे ध्वजवंदन
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी महापौर दीप चव्हाण होते. यावेळी यश आसाराम पालवे या चिमुरड्याच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जागीरदार आदींसह शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय पाठशाळेत उपक्रम
आबासाहेब काकडे समूहाच्या राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल व एन. एन. सथ्था फार्मसी कॉलेज येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या देशात असलेली लोकशाही ही जगातील एक आदर्श लोकशाही आहे, असे प्रतिपादन कर्करोग तज्ज्ञ डॉ.सतीश सोनवणे यांनी यावेळी केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक बी.एन.नन्नवरे, पदाधिकारी शरदराव भांबरे, मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे, प्राचार्य विशाल पांडे व विकास गवळी,गणेश धोंडे यावेळी उपस्थित होते. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

पाच शाळांचे ध्वजवंदन
हिंद सेवा मंडळाच्या पाच शाळांचे एकत्रित झेंडावंदन करण्यात आले. यावेळी पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली तसेच वृक्षारोपण करण्यात आले. दादा चौधरी माध्यमिक शाळा, भाईसथ्था नाईट हायस्कूल, पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय, दादा चौधरी मराठी शाळा व मेहेर इंग्लिश स्कूल या पाच शाळांचे एकत्रित झेंडावंदन करण्यात आले. एमआयडीसीमधील सन फार्मा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय राऊत व अ‍ॅड.अर्चना राऊत यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कर्याध्यक्ष अजित बोरा, सुमतीलाल कोठारी, अ‍ॅड. सुधीर झरकर, जगदीश झालाणी, जनशिक्षण संस्थेचे बाळासाहेब पवार उपस्थित होते.

सावताश्रम शिक्षण संस्थेत ध्वजवंदन
श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन संस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक राजकुमार शिंदे, मुख्याध्यापिका सुनीता पालवे व शिक्षक उपस्थित होते. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन बलिदान देणार्‍यांचे स्मरण नेहमी ठेवले पाहिजे, असे आवाहन बोराटे यांनी यावेळी केले.

माझी वसुंधरा शपथ
येथील शिशु संगोपन संस्थेत स्वातंत्र्य दिनी माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी करिअर करताना मनामध्ये देशप्रेम ठेवावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांनी केले. यावेळी शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल, महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय येथे सामूदायिक शपथ सोहळा झाला. उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड.विजयकुमार मुनोत, रिया गुंदेचा, प्राचार्या कांचन गावडे, मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोदकुमार कटारिया आदी उपस्थित होते.

महापालिकेत ध्वजवंदन
अहमदनगर महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून माझी वसुंधरा या अभियानानिमित्त स्वच्छ,सुंदर,हरीत शहर करण्याचा संकल्प करून शपथ घेण्यात आली. महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे,अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे उपस्थित होते.

कनोरे शाळेत ध्वजवंदन
येथील संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी मिळविलेले यश हे देशाभिमान वाढविणारे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय खेळाडू प्रा.संजय धोपावकर यांनी यावेळी केले. कल्याण रोड, ड्रिम सिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत ध्वजारोहण प्रसिद्ध जलतरणपटू निल सचिन शेकटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी हेमांगी व सचिन शेकटकर अध्यक्ष जितेंद्र लांडगे, विश्‍वस्त प्रमुख अरविंद धिरडे, उपाध्यक्ष मृणाल कनोरे, सचिव सुनिल पावले, संचालक कृष्णा बागडे, गणेश अष्टेकर, संजय सागावकर, विक्रम पाठक, बाबासाहेब वैद्य, प्रदीप वाव्हाळ, संजय दळवी, ऋतिका कनोरे, मुख्याध्यापिका कल्पना भामरे उपस्थित होते.

विश्‍वभारतीमध्ये स्वातंत्र्य दिन
जामखेड रोडवरील सारोळा बद्दी येथील विश्‍वभारती अ‍ॅकेडमीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या सौ.वैशाली धोंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तिरंगी रंगाचे 75 फुगे हवेत सोडण्यात आले. यावेळी सर्व विभाग प्रमुख व प्रथम वर्षाचे को-ऑडिनेटर, अभियांत्रिकी व तंत्रनिकेतचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हुतात्म्यांना अभिवादन
‘व्यर्थ न हो बलिदान’ या प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमाचे आयोजन करून शहर काँग्रेसचे ध्वजारोहण झाले. यानिमित्ताने हुतात्मांना आणि स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करत तसेच भारत छोडो आंदोलनातील नगर शहरातील तत्कालीन दोन घटनांना उजाळा यावेळी देण्यात आला. या दोन्ही घटनांचा स्मृतिस्तंभ व त्या बाजूने सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय शहर ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केला. मंगलगेट येथे अ‍ॅड.साहेबराव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, एम.आय.शेख, रवी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

गुणे आयुर्वेदमध्ये ध्वजवंदन
येथील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपाध्यक्ष आ.संग्राम जगताप, सचिव डॉ.विजय भंडारी, प्राचार्या डॉ.संगीता देशामुख, उपमहापौर गणेश भोसले, प्रा.माणिक विधाते, ज्ञानदेव पांडूळे, वैशाली ससे, डॉ.समीर होळकर उपस्थित होते. ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्यात जगतो आहे अशा स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले पाहिजे. करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आता बदलत असली तरी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आ. जगताप यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या आवारात ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवलेल्या सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आले होते.

सारडा विद्यालयात ध्वजवंदन
हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा.मकरंद खेर, कार्याध्यक्ष अजित बोरा, मधुसूदन सारडा, मुख्याध्यापक संजय मुदगल, मुख्याध्यापक (प्राथ.) विठ्ठल उरमुडे, पर्यवेक्षिका अलका भालेकर, शिक्षक गोविंद धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी कला व एनसीसी विभागाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांना वसुंधरा बचाव व थुंकणे विरोधी शपथ दिली गेली.

ज्ञानसंपदा शाळेत ध्वजवंदन
ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मीडियम तपोवन रोड, सावेडी शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे विश्‍वस्त मिलिंद गंधे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्ष प्रवीण बजाज, अविनाश बोपोर्डीकर, कारभारी भिंगारे, विनोद बजाज,सोनवणे, मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर उपस्थित होते. आय.आय.टी मध्ये निवड झालेला शाळेचा माजी विद्यार्थी संकेत आंबेकर याचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. चित्रकला व हस्तकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घरी तयार केलेल्या कलाकृतींनी शाळा सजविण्यात आली होती.

श्रीरामकृष्ण एज्युकेशनद्वारे ध्वजवंदन
श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत आणि मोहनलाल रामअवतार मानधना कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. उपाध्यक्ष नंदकुमार झंवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचा महावक्ता स्पर्धेत बाल शिवव्याख्याती प्रणाली बाबासाहेब कडूस हिचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सहसचिव राजेश झंवर, संस्थेचे सदस्य बजरंग दरक, रवींद्र गुजराथी, पुरुषोत्तमभाई पटेल, लक्ष्मीकांत झंवर, नंदलाल मणियार उपस्थित होते.

निमगाव वाघामध्ये वृक्षारोपण
नगर तालुक्यातील निमगाव वाघा गावात स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी लायन्स मिडटाऊनच्यावतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. नवनाथ विद्यालयात भारतीय हवाई दलातील जवान समीर शेख, ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच अलका गायकवाड तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरपंच रुपाली जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लायन्सच्या अध्यक्षा संपूर्णा सावंत, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, पी.एन. डफळ, प्रभाकर सुरकुटला, छाया राजपूत, प्रसाद मांढरे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, पूजा चव्हाण, सुरेखा भोसले आदी उपस्थित होते.

COMMENTS