भंडारदर्‍याच्या निसर्गसौंदर्याचा लुटला आनंद…;पर्यटकांचा आनंदोत्सव बहरला, रंधा परिसरात गर्दी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदर्‍याच्या निसर्गसौंदर्याचा लुटला आनंद…;पर्यटकांचा आनंदोत्सव बहरला, रंधा परिसरात गर्दी

अकोले/प्रतिनिधी-स्वातंत्र्यदिन व पारशी नववर्ष दिनाच्या सुट्टीनिमित्त भंडारदर्‍याच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला. पावसाळतात नेहमी

उद्योजक अजित सुरपुरिया यांचे निधन
महाशिवरात्रीनिमित्त संवत्सर येथे भालूरकर महाराजांचे कीर्तन
प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी

अकोले/प्रतिनिधी-स्वातंत्र्यदिन व पारशी नववर्ष दिनाच्या सुट्टीनिमित्त भंडारदर्‍याच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला. पावसाळतात नेहमी पावसाची संततधार व नद्या व ओढ्यांसह धबधब्याचा पूर पाहणार्‍या अकोलेकरांना तीन दिवसांत पर्यटकांचा महापूर पाहायला मिळाला. 15 ऑगस्ट व सलग सुट्ट्या आल्याने भंडारदरा कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्य परिसरात पर्यटकांचा लोंढे येत होते. वरुण राजाची कृपा झाल्याने कधी ऊन व कझी पावसाची रिमझीम अनुभवत तसेच निसर्गरम्य हिरवाईच्या सानिध्याचा मनमुराद आनंद पर्यटकांनी घेतला. गेल्या काही दिवसापासून पर्यटन बंद करण्यात आले होते. या भागात पर्यटकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, 14 ऑगस्ट पासून पर्यटन खुले करण्यात आल्याने तीन दिवसात या भागात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले. यावर्षी 15 ऑगस्ट रविवार रोजी स्वातंत्र्य दिन तर सोमवारी पारशी नववर्षानिमित्त सुट्टी जोडून आल्याने सुट्टयांमध्ये अनेकांनी पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्याचा आनंद घेतला. सुमारे 15 ते 20 हजार पर्यटकांनी भंडारदरा परिसरात हजेरी लावली तसेच कळसुबाई गडावर पर्यटकांची गर्दी होती. गडावर जाण्यासाठी मुंबई-पुणेचे पर्यटक आले होते. तसेच रंधा धबधबा परिसरात गर्दी ओसंडून वाहत होती. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा,हरिश्‍चंद्र गड, कळसुबाई शिखर, अमृतेश्‍वर मंदीर रतनवाडी, सांदण दरी या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे मुंबई आणि नगर जिल्हयातून मोठया प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसामुळे रस्ते मोठया प्रमाणात खराब झालेले आहेत. या भागातील रस्तेही अरुंद असल्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक नियमात बदल करण्यात आले होते. सुमारे 30ते 35 पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुरक्षेसाठी तसे आदेश दिले होते. त्यामुळे रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांच्यासह पोलिस फटांगरे, मोरे, डगळे, आघाडेंसह सर्व पोलीस कर्मचारी विशेष लक्ष ठेवून होते.

नियमांकडे दुर्लक्ष
पर्यटकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असताना देखील काही पर्यटक मास्क न घालणे पसंत करताना दिसलें तसेच चेक पोस्टवर कोणाकडे दारू सापडली तर ती त्यांच्यासमोरच ओतून दिली जात होती. मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये असे आवाहन राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नरेंद्र साबळे यांनी पेट्रोलिंग करताना वेळोवेळी केले.

COMMENTS