सोरायसिस (Psoriasis) हा त्वचेच्या विकाराशी संबंधित आजार आहे. हा आजार आनुवांशिक किंवा त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होण्यामुळे होतो. जवळपास २५ दशलक्ष
सोरायसिस (Psoriasis) हा त्वचेच्या विकाराशी संबंधित आजार आहे. हा आजार आनुवांशिक किंवा त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होण्यामुळे होतो. जवळपास २५ दशलक्ष भारतीय(25 million Indians) पीडित असलेला सोरायसिस हा गंभीर ऑटोइम्यून(Autoimmune) आजार आहे. या आजारात त्वचेची जळजळ(Inflammation) होणे, स्केलिंग(Scaling) आणि त्वचा लालसर(Reddish skin) होणे अशी लक्षणे दिसून येतात. या आजारासाठी वेळेवर उपचार, नियमितपणे डर्माटोलॉजिस्ट(Dermatologist) सोबत चर्चा करणे आणि त्यांनी दिलेल्या औषधांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
मानसिक आरोग्यावर मात कशाप्रकारे कराल ?
१. उच्च रक्तदाब सारख्या आजारांप्रमाणेच सोरायसिस(Psoriasis) स्पष्टपणे दिसून येतो. या आजारासोबत येणारी चिंता, तणाव व नैराश्य व्यक्तीचा आत्मविश्वास खालवू लागतो. यामुळे व्यक्तीला हिनतेच्या भावनांचा सामना करावा लागतो. वाढत्या आजारासोबत चिंता किंवा नैराश्य येऊ शकते. यामुळे हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो.
२. डर्मेटोलॉजिस्ट(Dermatologist) चा सल्ला घेतल्यास आपल्याला योग्य उपचार मिळू शकतो. तसेच यात तज्ज्ञ व मान्यताकृत पर्यायांमध्ये बायोलॉजिक्स(Biologics) सारख्या प्रगत उपचारांचा समावेश आहे. योग्य आहार, व्यायाम व तणाव व्यवस्थापन प्रयत्नांसह बायोलॉजिक्स फ्लेअर-अप्सची(Biology of Flare-Apps) वारंवारता व तीव्रता प्रभावीपणे कमी करते आणि रूग्णांना सामान्य जीवन जगण्यास मदत करते.
३. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सतत त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशिष्ट खाद्यपदार्थ, मद्यपान, धूम्रपान, तणाव, वातावरणीय बदल किंवा जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
४. या आजारासाठी अनेक केअर सेंटर देखील ज्यामुळे आपला तणाव कमी होऊ शकतो. व्यायाम केल्याने तणाव दूर होईल. ज्यामुळे तणावावर आपल्याला मात करता येईल.
COMMENTS