सुप्रिया सुळेंकडून सिंदखेड राजात आढावा… विकासकामांसाठी भेटणार केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रिया सुळेंकडून सिंदखेड राजात आढावा… विकासकामांसाठी भेटणार केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना

बुलडाणा/प्रतिनिधी ऐतिहासिक महत्व असलेल्या सिंदखेड राजा शहराचे पर्यटन वाढावे यासाठी सर्व यत्रणांनी एकत्र ऐवुन काम करण्याची गरज असल्याचे मत खासद

भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न
जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची टीका

बुलडाणा/प्रतिनिधी

ऐतिहासिक महत्व असलेल्या सिंदखेड राजा शहराचे पर्यटन वाढावे यासाठी सर्व यत्रणांनी एकत्र ऐवुन काम करण्याची गरज असल्याचे मत खासदार सुप्रीया सुळे यांनी आज येथे केले शहरातील ऐतिहासिक स्मारकांची  पाहणी केल्यानंतर ऐथील पंचायत समिती सभागृहात त्यांनी सर्व विभागाच्या अधिकारयांसोबत आढावा बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी शहराच्या संर्वागीन विकासासाठी आपण स्वत. प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.

            बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची उपस्थीती होती बैठकीला नियोजन मंडळाचे सदस्य अड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस राममुर्ती, जिल्हा परिषद सिइओ भाग्यश्री विसपुते, जाधव वंशज शिवाजी जाधव, नगराध्यक्ष सतिश तायडे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय तायडे, जिल्हा परिषद सभापती पुनम राठोड, तहसिलदार सुनिल सावंत, पालीका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, पंचायत समीती सभापती सौ. मिनाताई बंगाळे, जिल्हा नियोजन समीती सदस्य संदिप देशमुख.राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकारी जया वाहणे, केंद्रीय पुरातत्व विभागाचे संर्वधक मिलींद अंगाईतकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता काळवाघे, विद्युत मंडळाचे अभियंता अधिकारीआदीची उपस्थीती होती.

            या बैठकीत त्यांनी राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकारयांकडुन स्मारकांच्या विकास कामाचा आढावा घेतला ज्या गोष्टी अन्य देशात पाहयला मिळत नाहीत त्या आपल्याकडे अधिक आहेत विशेष करुन पर्यटन वाढीसाठी ऐतिहासिक वास्तुंचे जतन संर्वधन झाले पाहीजे यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज असलयाचे त्यांनी बैठकीला संबोधीत करतांना म्हटले सिंदखेड राजा, लोंणार व शेगाव या तिनही महत्वपुर्ण शहरांना जोडण्याची योजना आखली जावी अशी सुंचीत करुन त्यांनी सिंदखेड राजा शहरातील पायाभुत सुविधांवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे पालीकेला सांगीतले सिदखेड राजाच्या पर्यटन आणी ऐतिहासीक वास्तु संर्वधनासाठी आपण पालकमंत्री डॉ शिंगणे याचेंसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्रयाची भेट घेणार असलयाचा शब्ध त्यांनी दिला ऐतिहासिक वास्तु आणि त्याचा परिसर अधिक सुशोभित करण्यासाठी आभा लांबा सारख्या अभ्यासु व्यक्तींना भेटण्याच्या सुचना त्यानी यावेळी केल्या येत्या 15 दिवसात केंद्रीय पर्यटन मंत्रयांना भेटुन आपण हा विषय पुढे रेटनार असलयाचे सांगुन सुळे यांनी त्यासाठीचे सर्व प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाने तत्काळ आपल्याकडे पाठवावे असे सांगीतले जाधव यांच्या राजवाडयाला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यासाठी आपण संददेत हा विषय मांडणार असलयाचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले दरम्यान वन विभागातील इको टुरीझम प्रकल्प, जालना खामगाव शेगाव रेलवेमार्ग हे विषय त्यांनी समजुन घेतले.

COMMENTS