सीएसआर फंडातून भोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 14 लाख रूपये मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीएसआर फंडातून भोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 14 लाख रूपये मंजूर

भोळी, ता. खंडाळा येथे डेटवायलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सी.

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
मोर्चेबांधणीचे पीक जोमात
टँकरमधून डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश

डेटवायलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकार्यातून शाळेत होणार सुविधा

लोणंद / वार्ताहर : भोळी, ता. खंडाळा येथे डेटवायलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सी. एस. आर फंडाच्या माध्यमातून 14 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीच्या माध्यमातून या शाळेत विविध सुविधा निर्माण होणार आहेत. या कामाचा शुभारंभ कंपनी प्रशासन व समस्त भोळीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या निधीच्या माध्यमातून शाळेमध्ये शाळेचे स्वागत कमान ते शाळेचे स्टेजपर्यंत पेवर ब्लॉक, शाळेच्या सर्व खोल्यांना स्टायलिश फरशी, गार्डनिंग, सर्व शाळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी भोळी गावचे सामाजिक कार्यकर्ते विशेष कार्यकारी दंडाधिकारी अनंत रामचंद्र चव्हाण आणि शिवसेना खंडाळा तालुका प्रमुख आदेश दादा जमदाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मिळाले आहेत. भोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी कंपनीच्या माध्यमातून हा फंड मंजूर करून दिल्या बद्दल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच व ग्रामस्थांच्या मार्फत आभार व्यक्त करण्यात आले. कंपनीच्या माध्यमातून आज शाळेचा चेहरा मेहरा बदलण्यास मदत होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतील बदलामुळे अगदी आनंदी वातावरणात आल्यासारखे वाटेल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अशा प्रकारचे सहकार्य लाभल्यास खूप मोठे शैक्षणिक कार्य होईल.

उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे कंपनीचे एचआर मॅनेजर राजेंद्र नायडू, नवनाथ यादव, व्यंकटेश राऊत, शिवसेना तालुकाप्रमुख खंडाळा आदेश जमदाडे, सरपंच प्रशांत खुंटे, उपसरपंच महेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या मोनिका अनंत चव्हाण, सदस्य गोरखनाथ चव्हाण, सदस्य किरण चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत चव्हाण, अनंत चव्हाण, मनोज रामगुडे, मुख्याध्यापक संतोष नेवसे, नम्रता खुंटे, गावातील ग्रामस्थ भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते.

7-6

भोळी : जिल्हा परिषद शाळेच्या विकास कामकाजाचा शुभारंभ करताना मान्यवर. (छाया : सुशिल गायकवाड)

……………..

COMMENTS